
या दोन परदेशी तरुणींनी खास मर्दानी खेळांचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्यात मुक्काम केला. बेली व ॲना दोघीही नृत्य करतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे त्यांना मोठे आकर्षण आहे.शिवाजीराजे मर्दानी आखाडा या सोशल मीडिया पेजवर दोघींनी लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा साहसी खेळांचे व्हिडिओ पाहिले आणि त्यांना शिवकालीन मर्दानी खेळ शिकण्याची इच्छा झाली. त्यानंतर त्यांनी थेट पुणे गाठून श्रीशिवाजीराजे मर्दानी आखाडा गाठला व दोन दिवसात शिवकालीन मर्दानी खेळ शिकून घेतले. त्यानंतर त्याचे प्रात्यक्षिक सादर करण्याची संधी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने मिळाली. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या त्या आकर्षण ठरल्या.






