
जवळजवळ प्रत्येक उद्योग क्षेत्रासमोर एक मोठं आव्हान आहे. ते आव्हान म्हणजे नोकरी मिळवणे. कामातील कौशल्ये इतक्या वेगाने बदलत आहेत की नोकरीमधील आव्हान दिवसेंदिवस बदलत आहे. नोकऱ्या असणाऱ्या किंवा प्रोफेशनल्सकडे आता हा प्रश्न नाही की, कुणाकडे नोकरीचा किंवा कामाचा किती अनुभव आहे. यामध्ये खरा प्रश्न हा आहे की, समोरची व्यक्ती बदलत्या गरजांशी किती लवकर जुळवून घेत आहे. कारण आताच्या नोकरीतील स्किल्स असे आहे की, तुम्ही स्वतःला सततच्या बदलात किती बदलता आणि अपडेट ठेवता.
‘Beyond AI, CVs & JDs with LinkedIn’ हाच मुद्दा दुसऱ्या एपिसोडमध्ये केंद्रस्थानी आहे. झी मीडियाच्या सहकार्याने तयार झालेल्या “अबाउट एआय” च्या दुसऱ्या भागात हा विषय आहे. या संभाषणात लिंक्डइनच्या एपीएसी व्हीपी – टॅलेंट अँड लर्निंग सोल्युशन्स रुची आनंद आणि विप्रोचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर संजीव जैन हे आहेत. भारतातील बदलत्या नोकरीच्या क्षेत्रात AI आणि त्याच्या स्किल्सची मागणी वेगाने बदलत आहे. तसेच करिअर सुरक्षित करण्यासाठी आणि भविष्यासाठी काय आवश्यक आहे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
AI च्या काळात शिकणं कधीच संपणार नाही
एआयने आपण काम कसे समजून घेतो आणि कसे अंमलात आणतो या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे. रुची आनंद या बदलाचे प्रमाण स्पष्ट करताना सांगतात की, आज कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली 70% कौशल्ये 2030 पर्यंत पूर्णपणे बदलली असतील. याचा अर्थ असा की,नावीण्य अन् नवनव्या गोष्टी शिकण्याकडे कल राहिलेला नाही. मात्र व्यावसायिकांना त्यांच्या स्किल्समध्ये सतत नवीन कौशल्ये जोडावी लागतील.
संजीव जैन, या युगाचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी, एआयच्या प्रभावाची तुलना औद्योगिक क्रांतीदरम्यान उदयास आलेल्या असेंब्ली लाइनशी करतात. यामुळे काम करण्याची पद्धत कायमची बदलली. त्यांच्या मते, आज एआय समजून घेतल्याने संस्थांना मोठ्या प्रमाणात इनोवेशन करण्यास सक्षम बनवले आहे. म्हणूनच AI साक्षरता आता केवळ प्रवेश-स्तरीय पदांसाठीच नाही तर नेतृत्व भूमिकांसाठी देखील आवश्यक आहे. एआयची गरज आता किमान आवश्यकता बनली आहे. पण व्यावसायिक याचा कसा वापर करुन घेतील आणि गोष्टी अधिक क्रियाशील करतील याकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
नवीन प्राधान्ये: मानवी कौशल्यांचे वाढते महत्त्व
जसजसे AI ज्ञान अधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. तसतसे मानवी जीवनात त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होत आहेत. रुची आनंद स्पष्ट करतात की, सर्जनशीलता, समस्या सोडवणे, स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि नव नवे उपक्रम यासारखी कौशल्ये आता तंत्रज्ञानापासून फायनान्स आणि ऑपरेशन्सपर्यंत प्रत्येक भूमिकेत महत्त्वाची आहेत. ही अशी वेगवेगळी कौशल्ये रिक्रूटर्स एकाच व्यक्तीमध्ये शोधत असतात. भारतातील 64% रिक्रूटर्स करणारे असे मानतात की टेक्निकल आणि मानवी कौशल्यांचे योग्य संतुलन असलेले उमेदवार शोधणे त्यांना कठीण जात आहे.
शिकणे हीच खरी ओळख
ही दरी भरून काढण्यासाठी, सतत शिकणे आणि ते स्पष्टपणे दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रुची आनंद हे ट्रॅफिक सिग्नलच्या उदाहरणाने स्पष्ट करतात. कोणत्याही कारणाशिवाय सतत नोकरी बदलणे किंवा ब्रेक घेणे हे रिक्रूटर्ससाठी रेड सिग्नलप्रमाणे असते. या मागची कारणे प्रोफेशनल्सला समझावणे अतिशय महत्त्वाचे असते. अपूर्ण प्रोफाइल तसेच ज्यामध्ये महत्त्वाचे स्किल्सची माहिती नसेल त्या गोष्टी यल्लो सिग्नल म्हणून ओळखले जाते. दरम्यान, एक स्पष्ट आणि मजबूत प्रोफाइल – ज्यामध्ये चांगला प्रोफाइल सारांश, एक मजबूत स्किल सेट आणि ‘ओपन टू वर्क’ असे असते ते रिक्रूटर्सना हिरवा सिग्नल देते.
Open to Work, नोटिस पीरियड, सॅलरी एक्सपेक्टेशन आणि अपडेटेड स्किल्स यासारखे फिचर्स रिक्रूटर्सला महत्त्वाचे असतात. यावरुन त्या प्रोफेशनलची तयारी आणि त्याबाबत विश्वास निर्माण होण्यास मदत होते. मिळालेल्या आकडेवारीनुसार, ज्या LinkedIn प्रोफाइल्समध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त स्किल्स असतात. त्यांना रिक्रूटर्सद्वारे निवडण्याची शक्यता 5.6 टक्के अधिक असते. बदलत्या जॉब मार्केटमध्ये अशाच प्रोफेशनला चांगली मागणी आहे आणि तेच पुढे जाणार आहेत. ज्यांच्याकडे शिकण्याची इच्छा, निश्चय आणि स्वतःला बदलण्याची क्षमता असेल त्यांना पहिल प्राधान्य दिलं जातं.








