
हिमाचल प्रदेशातील शिमला येथे बलात्काराची शिकार झालेल्या १९ वर्षीय तरुणीने रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघेही रुग्णालयात दाखल आहेत. पीडितेने अज्ञात व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. सिमल्यातील ठियोग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.