अजितदादांनी छगन भुजबळांचे कान टोचले; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?

0
4
अजितदादांनी छगन भुजबळांचे कान टोचले; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?


Ajit Pawar: पालकमंत्रिपदाच्या वादावरून अजितदादांनी छगन भुजबळांना सुनावलंय. कुणाचे किती आमदार किती आहे हे विचारण्याचे कारण नसल्याचं सांगत अजितदादांनी भुजबळांना खडसावलंय.तसेच पालकमंत्रिपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असल्याचंही अजितदादांनी म्हटलंय. दरम्यान नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार आहे त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी आग्रह धरावा असं भुजबळांनी म्हटलं होतं. त्यावर बोलतांना अजित पवारांनी भुजबळांचे कान टोचलेत.

नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी छगन भुजबळांनी गेल्या काही दिवसांपासून फिल्डिंग लावलीय. खरं तर नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद निर्माण झाला तेव्हा भुजबळ मंत्रिमंडळात नव्हते. शिवाय पालकमंत्रिपदाच्या रेसमध्येही नव्हते. नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा शिवसेना आणि भाजपनं प्रतिष्ठेचा केला होता. शिवसेनेचे दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यात आणि त्यांच्या पक्षात रस्सीखेच होती. नाही म्हणायला क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेही स्पर्धेत होते पण त्यांच्या नावाचा फारसा विचार होत नव्हता. 

भुजबळांना जसं मंत्रिपद मिळालं तसं त्यांनी पालकमंत्रिपदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली. पहिल्यांदा तर त्यांनी ध्वजारोहणासाठी लांबचं ठिकाण आहे म्हणून गोंदियाला जायला नकार दिला. त्यानंतर आता थेट सात आमदार राष्ट्रवादीचे त्यामुळं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला पाहिजे असं सांगून दावाच ठोकला.

भुजबळांच्या दाव्याला विरोध करण्यासाठी शिवसेना आमदार सुहास कांदे समोर आले. त्यांनी छगन भुजबळांच्या नावाला विरोध केलाच, शिवाय राष्ट्रवादीच्या आमदारांचाही भुजबळांच्या नावाला विरोध असल्याचा दावा त्यांनी केला.

पालकमंत्रिपदावर दावा ठोकणा-या छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कानपिचक्या दिल्यात. पालकमंत्रिपदी कुणाला नेमायचं याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळं छगन भुजबळांनी नाशिकमधील आमदारसंख्या मोजू नये असा सल्ला अजित पवारांनी दिलाय.

नाशिकचं पालकमंत्रिपद हा महायुतीत कळीचा मुद्दा झालाय. नाशिकच्या महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या प्रत्येक पक्षाला नाशिकचं पालकमंत्रिपद हवंय. आता या पालकमंत्रिपदाच्या लढाईत भुजबळांनी उडी घेतल्यानं हा तिढा आणखीनच वाढण्याची चिन्हं दिसू लागली. त्यामुळंच अजितदादांनी पुढाकार घेत भुजबळांचे कान टोचलेत. 

FAQ

प्रश्न: नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी छगन भुजबळ यांनी का दावा ठोकला आहे?

उत्तर: छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सात आमदार असल्याचा आधार घेत पालकमंत्रिपदावर दावा ठोकला आहे. मंत्रिमंडळात प्रवेश मिळाल्यावर त्यांनी या पदासाठी आग्रह धरला, तसेच स्वातंत्र्यदिनी गोंदियाला ध्वजारोहणासाठी जाण्यास नकार देत “सर्व काही नाशिकमध्येच करायचे” अशी भूमिका घेतली. त्यांचा दावा आहे की, सर्वाधिक आमदारांमुळे राष्ट्रवादीला हे पद मिळायला हवे.

प्रश्न: अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना काय सल्ला दिला आहे?

उत्तर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी आमदारसंख्या मोजू नये, असा सल्ला दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, पालकमंत्रिपदाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकार आहे. भुजबळांचा दावा आणि आग्रह पाहता, अजित पवारांनी त्यांना कानपिचक्या देत हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रश्न: नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद का चिघळला आहे आणि कोण कोण यात सामील आहे?

उत्तर: नाशिकच्या पालकमंत्रिपदावर महायुतीतील शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात रस्सीखेच आहे. शिवसेनेचे दादा भुसे, भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे प्रमुख दावेदार आहेत. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांच्या नावाला विरोध केला, तर काही राष्ट्रवादी आमदारही भुजबळांना पाठिंबा देत नसल्याचा दावा आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक तीव्र झाला आहे.





Source link