Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेश'अखेर चाणक्यलाही...', चेहऱ्यावरील केसांवरुन ट्रोल करणाऱ्यांना बोर्ड टॉपर प्राची निगमने दिलं सडेतोड...

‘अखेर चाणक्यलाही…’, चेहऱ्यावरील केसांवरुन ट्रोल करणाऱ्यांना बोर्ड टॉपर प्राची निगमने दिलं सडेतोड उत्तर

‘अखेर चाणक्यलाही…’, चेहऱ्यावरील केसांवरुन ट्रोल करणाऱ्यांना बोर्ड टॉपर प्राची निगमने दिलं सडेतोड उत्तर

[ad_1]

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दहावी बोर्ड परीक्षेत पहिला क्रमांक पटकावणारी प्राची निगम (Prachi Nigam) आपल्या कामगिरीपेक्षा दिसण्यामुळे जास्त चर्चेत आली होती. अनेकांनी तिच्या यशाचं कौतुक करण्यापेक्षा, दिसण्यावरुन जास्त ट्रोल केलं. चेहऱ्यावर केस असल्याने असल्याने ती मुलगा असल्याचं अनेकजण उपहासात्मकपणे म्हणत होते. यादरम्यान दहावीत 98.5 टक्के गुण मिळवणाऱ्या प्राची निगमने या सर्व टीकाकारांना उत्तर दिलं आहे. माझं दिसणं नव्हे तर गुण जास्त महत्वाचे आहेत असं प्राची निगमने म्हटलं आहे. 

“लोक मला ट्रोल करत असल्याचं पाहिलं तेव्हा मला जास्त फरक पडला नाही. माझे गुण महत्वाचे आहेत, चेहऱ्यावरचे केस नाही,” असं उत्तर प्राची निगमने ट्रोल करणाऱ्यांना दिलं आहे. 

प्राचीने यावेळी आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांचेही आभार मानले आहेत. “उत्तर प्रदेश बोर्ड परीक्षेत मी टॉप केल्यानंतर जेव्हा माझा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला तेव्हा काही लोकांनी मला ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण त्याचवेळी काही लोकांनी मला पाठिंबा दिला. मला त्या सर्वांचे आभार मानायचे आहेत”.

ज्यांना माझ्या चेहऱ्यावर केस असणं विचित्र वाटत आहे, ते मला ट्रोल करणं सुरु ठेवू शकतात. याच्याने मला काही फरक पडत नाही असंही प्राचीने म्हटलं आहे. पुढे ती म्हणाली की, “चाणक्य यांनाही त्यांच्या दिसण्यावरुन ट्रोल करण्यात आलं होतं. पण त्यांना त्यांचा काही फरक पडला नाही”.

ट्रोलिंगमुळे थोडं वाईट वाटलं अशी कबुलीही तिने दिली. “नक्कीच तुम्हाला थोडं वाईट वाटतं. पण सोशल मीडियावर लोक हवं ते लिहित असतात आणि आपण त्याबद्दल काही करु शकत नाही. जर मला थोडे कमी मार्क मिळाले असते तर कदाचित सोशल मीडियावर इतकी प्रसिद्ध झाली नसती. मला कदाचित चेहऱ्यावरील केसांमुळे ट्रोलिंग सहन करावं लागलं नसतं,” असंही प्राचीने म्हटलं आहे. दरम्यान प्राचीने मोठं होऊन इंजिनिअर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

युपी बोर्ड परीक्षेत टॉप केल्यानंतर प्राची निगमचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळी काहींनी तिच्या चेहऱ्यावरील केसांवरुन खिल्ली उडवली होती. तर काहींनी मात्र तिला पाठिंबा देत बोर्ड परीक्षेतील कामगिरीचं कौतुक केलं होतं. सोशल मीडियावरील ट्रोलिंग मर्यादेपलीकडे जाऊ लागल्यानंतर ऑनलाइन कम्युनिटीने याविरोधात लढा उभारला होता. प्राचीवर अशा कमेंट्समुळे होणाऱ्या भावनिक परिणामावरही चर्चा करण्यात आली. 

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीही प्राचीशी संवाद साधला आणि आपलं स्वप्न पूर्ण कऱण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. बोर्ड परीक्षेतील तिच्या यशाचं कौतुक करताना त्यांनी अशा ट्रोलिंगमुळे फरक पडू देऊ नकोस असा सल्लाही दिला. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments