₹10,01,35,60,00,00,00,00,00,01,00,23,56,00,00,00,00,299; आईच्या निधनानंतर अकाऊंटमध्ये आली तब्बल इतकी रक्कम; मोजून थकले

0
164
₹10,01,35,60,00,00,00,00,00,01,00,23,56,00,00,00,00,299; आईच्या निधनानंतर अकाऊंटमध्ये आली तब्बल इतकी रक्कम; मोजून थकले


Viral News: राजधानी दिल्लीला लागून असणाऱ्या नोएडामध्ये एका 20 वर्षीय तरुणाच्या खात्यात अचानक इतके पैसे आले की बँक कर्मचारी हैराण झाले. ही रक्कम इतकी मोठी होती की, तिला मोजणंही कठीण झालं होतं. रकमेचा हा आकडा 37 अंकी आहे. अनेकांनी दावा केला आहे की, दीपक नावाचा हा तरुण भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापेक्षाही जास्त श्रीमंत झाला आहे. त्याच्या खात्यात तब्बल ₹10,01,35,60,00,00,00,00,00,01,00,23,56,00,00,00,00,299 इतकी रक्कम आली आहे. ही बातमी पसरताच दीपकला नातेवाईक, शेजारी आणि मित्रांचे फोन येऊ लागले. इतके फोन येऊ लागल्यानंतर दीपकही हैराण झाला आणि आपला फोन बंद करुन टाकला. 

सचिन गुप्ता नावाच्या एका पत्रकाराने सकाळी याबद्दल पोस्ट शेअर केली होती. त्यांनी सांगितलं की. हे पैसे 20 वर्षीय दीपकच्या कोटक बँक खात्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की ही रक्कम सुमारे 1 अब्ज 13 लाख 56 हजार कोटी आहे. सचिन गुप्ता यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “माझे गणित थोडे कमकुवत आहे. इतर लोक गुणाकार आणि भागाकार करू शकतात. सध्या, आयकर विभाग याची चौकशी करत आहे. बँक खाते गोठवण्यात आले आहे.”

काय होता मेसेज?

मीडिया रिपोर्टनुसार, हे खातं दीपकची आई गायत्री देवी यांचं होतं. दोन महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं होतं. यानंतर दीपक हे अकाऊंट चालवत होता. 3 ऑगस्टच्या रात्री दीपकला एक मेसेज आला होता. या मेसेजमध्ये खात्यात ₹1.13 लाख करोड़ (₹1,13,56,000 करोड़) जमा झाल्याचं लिहिण्यात आलं होतं. 

हा मेसेज पाहिल्यानंतर दीपकलाही विश्वास बसत नव्हता. त्याने आपल्या मित्रांना मेसेज दाखवला आणि शून्य मोजण्यास सांगितले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी दीपक बँकेत गेला. आपल्या खात्यात खरंच इतके पैसे जमा झाले आहेत का? हे त्याला जाणून घ्यायचं होतं. बँक अधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं की, त्याच्या खात्यात खरोखरच इतके पैसे आहेत. पण त्यांनी त्याला इतके पैसे जमा केल्याने संशय निर्माण होत आहे, यामुळे खाते गोठवण्यात आले आहे असंही त्यांनी सांगितलं. बँकेने ताबडतोब आयकर विभागाला याबद्दल माहिती दिली. आयकर विभाग आता या प्रकरणाची चौकशी करत आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

ही तांत्रिक किंवा बँकेची चूक होती की पैशांच्या अफरातफरीचे प्रकरण आहे याचा तपास अधिकारी करत आहेत. चौकशीनंतरच सत्य समोर येईल. अनेक नेटकऱ्यांनी हे शक्य नसल्याचं म्हटलं आहे. एका युजरने लिहिलं आहे की, “हे शक्य नाही. ही बँकेच्या सॉफ्टवेअरमधील किंवा मॅन्युअल एन्ट्रीमधील चूक आहे.”

दुसऱ्या एका युजरने 20 वर्षांचा मुलगा आता अंबानींपेक्षा श्रीमंत आहे असं उपाहासात्मकपणे म्हटलं आहे. एका व्यक्तीने तर रक्कम मोजण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, “एकशे क्विंटिलियन, एकशे पस्तीस क्वाड्रिलियन, सहाशे ट्रिलियन, दहा दशलक्ष, तेवीस हजार, पाचशे साठ आणि दोनशे नव्वद.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘कोणाला अच्छे दिन आले असतील किंवा नसतील, पण भावाचे चांगले दिवस आले आहेत. त्याने मोदीजींचे आभार मानले पाहिजेत.’





Source link