
RCH News : राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या मुख्य योजनांपैकी एक म्हणजे बालमृत्यू दर, माता मृत्यू दर कमी करणे व देशभरातील गर्भवती महिला आणि बालकांना दर्जेदार सेवा सुनिश्चित करणे आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने माता व बाल आरोग्य संबंधित सेवांची माहिती मिळविण्यासाठी प्रजनन व बाल आरोग्य (आरसीएच) पोर्टल सुरू केले असून यावर गर्भवती मातांची नोंद केली जाते. ही आरसीएच नोंद केल्यानंतर त्यांना ‘आरसीएच’ नंबर मिळतो. या नोंदणीनंतरच महिलांना राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळे ही नोंद केली नसेल तर त्वरित करावी. अन्यथा शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.