माझ्या हिश्श्याचे किस्से: सुनील दत्त : आपले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यावरही शब्द पाळण्याची होती चिंता

0
14
माझ्या हिश्श्याचे किस्से: सुनील दत्त : आपले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यावरही शब्द पाळण्याची होती चिंता


रूमी जाफरी6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

इतके जखमी झाले असून आणि खांदा फ्रॅक्चर झाला असतानाही रस्ता ओलांडून दत्त साहेब एसटीडी बूथवर गेले. त्यांनी बाबूभाई कुरेशींना फोन केला. म्हणाले, ‘बाबू, मी तुमच्या मुलाच्या रिसेप्शनला पोहोचू शकणार नाही. मी निघालो होतो, पण माझं हेेलिकॉप्टर इथं नाशिकमध्ये क्रॅश झालंय…’

श्श्याच्या किश्श्यांमध्ये आज सुनील दत्त साहेबांबद्दल बोलूया. काही राज्यांमध्ये निवडणुकीचे वातावरण आहे. टीव्हीवर प्रचार सभा, रोड शो, पदयात्रा वगैरे पाहताना मला दत्त साहेबांची आठवण आली. केवळ अभिनेता सुनील दत्त नव्हे, तर नेता सुनील दत्त, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ता सुनील दत्त.. अशी त्यांची रूपे आठवली. मला जे थोडेफार राजकारण समजते त्यानुसार सुनील दत्त हे देशातील मोजक्या चांगल्या गांधीवादी नेत्यांपैकी एक होते.

आपल्या देशात अनेक नेत्यांनी राजकीय यात्रा काढल्या. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची पदयात्रा, राजीव गांधींची सद्भावना यात्रा, अडवाणीजींची रथयात्रा, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा.. पण, दत्त साहेबांनी काढलेली पदयात्रा कदाचित लोकांच्या विस्मरणात गेली असावी आहे. पंजाबात दहशतवाद पराकोटीला पोहोचला असताना त्यांनी मुंबई ते अमृतसर अशी शांतीचा संदेश देणारी यात्रा काढली. सुवर्ण मंदिरातील प्रार्थनेने यात्रेचा समारोप झाला. त्यातून पंजाबात शांततेचा संदेश गेला, वातावरण बऱ्याच प्रमाणात निवळले.

देशात त्यांनी यात्रेचे आयोजन केलेच, पण जपानमध्ये जाऊन हिरोशिमापासून नागासाकीपर्यंत आण्विक शस्त्रांच्या वापराविरोधातही पदयात्रा काढली. दत्तसाहेबांनी या यात्रांमधून केवळ शांती आणि प्रेमाचा संदेश दिला. एखाद्या पदाच्या प्राप्तीसाठी, स्वत:च्या लोकप्रियतेसाठी किंवा प्रचाराकरिता कधीही अशा या यात्रांचा उपयोग करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. कदाचित त्यामुळेच लोक दत्त साहेबांच्या या यात्रा विसरले असावेत. दत्त साहेब केवळ राजकीय नेत्यासारखे दिसण्यापुरते किंवा बोलण्यापुरते नव्हे, तर आपल्या व्यक्तिगत आयुष्यात, आचार – विचारांनीही महान होते. आपल्यालाही हे जाणवेल, असा एक किस्सा मी आज सांगणार आहे.

मुंबईमध्ये एक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचे नाव होते बाबूभाई कुरेशी. ही गोष्ट जवळपास २२ वर्षांपूर्वीची असेल. बाबूभाईंचा मुलगा इम्रानचा विवाह होता. लग्नात मुलाला आशीर्वाद द्यायला आवर्जून या, अशी विनंती बाबूभाईंनी दत्त साहेबांना केली. दत्त साहेबांनीही आपण नक्की येऊ, असे सांगितले. ते आपल्या शब्दाचे इतके पक्के होते की कधीही तो मोडत नसत. ज्या वेळी संजू तुरुंगात गेला होता तेव्हा ते म्हणाले होते की, मी या वेळची (१९९६) लोकसभा निवडणूक लढणार नाही. आणि त्यांनी ती लढवलीही नाही. ‘मदर इंडिया’तील आगीचे दृश्य चित्रित करताना नर्गिसजी आतमध्ये अडकल्या, तेव्हा दत्त साहेबांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांना वाचवले होते, ही गोष्ट तशी जगजाहीर आहे. पण, आज मी तुम्हाला दुसरा किस्सा सांगणार आहे.

ही गोष्ट १७ मार्च २००१ ची आहे. बाबूभाईंच्या मुलाच्या लग्नाचे रिसेप्शन होते. दत्त साहेब कुठल्या तरी कार्यक्रमाला गेले होते, पण त्यांनी बाबूभाईंना येण्याविषयी शब्द दिला होता. त्यामुळे ते तिथून हेलिकॉप्टरने निघाले. त्या वेळी त्यांच्या मित्राच्या दोन मुलीही सोबत होत्या. संध्याकाळची वेळ होती. दत्त साहेबांचे हेलिकॉप्टर नाशिकजवळ अचानक क्रॅश होऊन एका शेतात कोसळले. पायलटच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव होऊन तो बेशुद्ध पडला. हेलिकॉप्टरचा दरवाजा उघडला जात नव्हता. हळूहळू त्याला खालच्या बाजूने आग लागण्यास सुरुवात झाली. आजूबाजूला काही शेतकरी होते. त्यांनी हेलिकॉप्टर कोसळल्याचे पाहिले आणि त्या दिशेने धाव घेतली. दत्त साहेब आपल्या खांद्याने धक्के देऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत होते.

आतमध्ये दत्त साहेबांना पाहताच गावकरी कुदळ – फावडे घेऊन आले आणि दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करू लागले. तोवर दत्त साहेबांनी खांद्याने इतक्या जोरजोरात दरवाजावर धक्के मारले होते की, त्यांच्या खांद्याचे आणि मानेचे हाड फ्रॅक्चर झाले. त्यांनी त्या वेळी किती वेदना होत असतील याची आपण कल्पना करू शकतो. पण, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. अखेर गावकऱ्यांची धडपड आणि दत्त साहेबांनी दिलेल्या धक्क्यांमुळे दरवाजा उघडला. पण, तो खूप उंचावर होता. दत्त साहेबांनी त्या मुलींना आधी उतरायला सांगितले. तर त्या दोघी, ‘अंकल, तुम्हीच आधी उतरा’ असे म्हणू लागल्या. दत्त साहेब म्हणाले, ‘मुलींनो, मी भरपूर जगलोय, मला काही झालं तर फारसं काही बिघडणार नाही. पण, तुमच्या पुढं सारं आयुष्य पडलंय..’ विचार करा. तशा स्थितीतही दत्त साहेब असं बोलत होते.

आधी त्यांनी मुलींना उडी मारायला लावली. मग जखमी पायलटला बाहेर काढलं आणि नंतर स्वत: बाहेर निघाले. गावकऱ्यांसोबत सगळ्यांना घेऊन ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथं इतरांना अॅडमिट केल्यावर स्वत: इतके जखमी असतानाही ते तिथल्या रिसेप्शन काउंटरवर गेले आणि ‘मला मंुबईला एक फोन करायचाय,’ असं म्हणाले. त्यावर तेथील स्टाफने त्यांना सांगितलं की, इथं फोन आहे, पण तो लोकल आहे, एसटीडी नाही. बाहेर रस्त्याच्या पलीकडे एक टेलिफोन बूथ आहे, तिथे एसटीडी असेल. इतके जखमी झाले असून आणि खांदा फ्रॅक्चर झाला असतानाही रस्ता ओलांडून दत्त साहेब एसटीडी बूथवर गेले. तिथून त्यांनी बाबूभाई कुरेशींना फोन केला आणि म्हणाले, ‘बाबू, मी तुमच्या मुलाच्या रिसेप्शनला पोहोचू शकणार नाही. मी निघालो होतो, पण माझं हेलिकॉप्टर इथं नाशिकमध्ये क्रॅश झालंय… बस. इथं माझे शब्दच गोठलेत. यापुढं आणखी काय बोलू? दत्त साहेब असे उदात्त विचार आणि तशीच महानता असलेले माणूस होते. याप्रसंगी अल्ताफ़ हुसेन हाली यांचा एक शेर आठवतोय…

फ़रिश्ते से बढ़कर है इंसान बनना, मगर इस में लगती है मेहनत ज़ियादा। दत्त साहेबांचे बोलणे, त्यांच्याबाबतीत घडलेले प्रसंग, त्यांचे किस्से ऐकल्यावर वाटतं की, हे खरे आहे की चित्रपटातील दृश्य आहे? आज अवतीभोवती त्यांच्यासारखा माणूस दिसत नाही. त्यांच्या आठवणीत ‘दीदी’मधील त्यांचे हे गाणे ऐका. हमने सुना था एक है भारत, सब मुल्कों से नेक है भारत। स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

(लेखक बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक आहेत.)



Source link