
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महायुतीने २३५ जागा मिळवल्य़ाने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. एकट्या भाजपने १३२ जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीत ‘व्होट जिहाद’चा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. मौलाना सज्जाद नोमानी यांनी भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांची खिल्ली उडवली आणि स्वत:चे नाव धनश्याम ठेवण्याचा सल्ला दिला. आता निवडणूक निकालानंतर नोमानी यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, त्यांचा हेतू कोणत्याही विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्याचा किंवा फतवा काढण्याचा नव्हता.