
प्रसिद्ध दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांनी मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या अभिनयाने स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मात्र दुर्दैवाने २०१२ साली त्यांचे अपघाती निधन झाले. मात्र आजही त्यांनी केलेल्या भूमिकांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, आनंद अभ्यंकर यांची मुलगीदेखील एक कलाकार असून ती सिनेइंडस्ट्रीतदेखील कार्यरत आहे. चला जाणून घेऊया त्यांच्या मुलीविषयी…








