
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नवा दावा केला आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाणारे बाबासाहेब आंबेडकरही संघाच्या शाखेत आले होते, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यम शाखेने केला आहे. २ जानेवारी १९४० रोजी त्यांनी सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका शाखेला भेट तर दिलीच, शिवाय तेथे उपस्थित स्वयंसेवकांनाही संबोधित केले.





