
या नव्या संकल्पनेबद्दल बोलताना पीव्हीआर आयनॉक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता म्हणाले की, अत्यंत उच्च दर्जाची ध्वनी व्यवस्था आणि दृकश्राव्य अनुभवामुळे मोठ्या पडद्यावर ट्रेलर पाहण्याचा अनुभव रोमांचकारी बनतो आणि चित्रपटाविषयीच्या उत्सुकतेत आणि चित्रपट पाहण्याच्या उत्कंठेत मोलाची भर पाडणारा असतो. या ३० मिनिटांच्या ट्रेलर स्क्रीनिंग शोच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी मोठ्या पडद्यावर आटोपशीर, उत्कृष्ट अनुभव देणारे मनोरंजन आणि ते सुद्धा केवळ एक रुपया इतक्या कमी किंमतीत देऊन खस सरप्राईज देत आहोत. आपल्या आवडत्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरचा आनंद आरामदायी आसनांवर आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांसह प्रेक्षक घेऊ शकणार आहेत.








