
‘जेव्हा कुणबी मराठावर अन्याय होतो, तेव्हा मराठा समाज सोबत असतो. परंतु आरक्षणाचा विषय येतो, तेव्हा कुणबी मराठा आमचा संबंध नाही अशी भूमिका घेतात. मराठा आरक्षणाच्या बैठकीला काही कुणबी बांधव असतात. ते अण्णासाहेब पाटील, सारथी योजनेचा लाभ घेतात. त्यांना दुहेरी लाभ मिळतो. त्यावेळेस मराठा समाजाचे नुकसान होते, असे किरण पवार म्हणाले.




