
लोकसभेत ३३ खासदारांना निलंबित केल्यानंतर आता राज्यसभेतूनही ४५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. संसदेत घुसखोरी प्रकरणावरून गदारोळ केल्याप्रकरणी या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. तत्पूर्वी आजच लोकसभेच्या ३३ खासदारांनाही निलंबित करण्यात आले होते. मागील आठवड्यात १४ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. अशा प्रकारे हिवाळी अधिवेशनात एकूण ९२ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.







