
वृत्तानुसार, एका १४ वर्षांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात अटक टाळण्यासाठी सूर्या ही तिच्या पतीच्या घरी गेली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. सूर्याचे नाव हे तिचा अट्टल गुन्हेगार असलेला गँगस्टर बॉयफ्रेंड ‘हायकोर्ट महाराजा’सोबत अपहरण प्रकरणात पुढे आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईसोबत पैशांवरून काही वाद झाल्यानंतर ११ जुलै रोजी ती मुलाला घेऊन गेली होती. या कामात त्यांचे सहकारी सेंथिल कुमार यांनीही दोघांना साथ दिली. दोघांनी अपहरण केलेल्या मुलीच्या आईकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, मात्र मदुरे पोलिसांनी आरोपीच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. यानंतर पोलिसांनी सूर्यासह या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेतला. सुमारे ९ महिन्यांपूर्वी सूर्या ही पती रंजीत यांना सोडून गँगस्टर हायकोर्ट महाराजांसोबत पळून गेली होती.