Laxman Hake on Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांना सर्वसामान्य माणसांचं काही देणंघेणं नाही. त्यांना साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये (Sugar Factrory Election) आणि कारखाना ताब्यात ठेवण्यामध्ये इंटरेस्ट असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केली. ते साताऱ्यात आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजितदादा को-ऑपरेटिव्ह कारखाना ताब्यात घेतात आणि त्याचे खाजगीकरण करुन 500 कोटीचा कारखाना पाच-पन्नास कोटीमध्ये विकत कसा विकत घ्यायचा हे त्यांचं वर्तन आहे. हा माझा त्यांच्यावर आरोप असल्याचे हाके म्हणाले.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी ब वर्ग संस्था मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केली आहे. बारामती खरेदी विक्री संघातून ते संस्था मतदार संघासाठी प्रतिनिधी म्हणून आले आहेत. यावरुनच हाके यांनी त्यांच्यावर टीका केली.
पुण्यामध्ये वाहून गेलेल्या पूलाविषयी अजितदादांना काही घेणेदेणे नाही
पुण्यामध्ये वाहून गेलेल्या पूलाविषयी अजितदादांना काही घेणेदेणे नाही. ते मात्र माळेगावमध्ये गावोगाव फिरुन एखाद्या ग्रामपंचायतची निवडणूक असल्यासारखे रममान आहेत. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री एखाद्या कारखान्याच्या निवडणुकीला गावांमध्ये सभा घेत असेल तर त्यांचा असली चेहरा वेगळा आहे आणि दाखवायचा चेहरा वेगळा आहे असंच त्यांना म्हणावं लागेल अशी टीका हाके यांनी केली. ऑगस्ट अखेरीस नांदेड ते मुंबई आरक्षणाच्या हक्कासाठी लॉंग मार्च काढणार आहोत. ओबीसींचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना जाब विचारु असेही हाके म्हणाले.
आम्हाला धमक्या द्यायच्या भानगडीत कोणी पडू नये
महाज्योतीला फंड मिळावा याबरोबरच सर्व विभागाच्या महामंडळांना निधी मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे. याचे उत्तर न देता वैयक्तिक पातळीवर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर टीका करत आहेत. कोणी कितीही टीका केली तरी आम्ही रात्रंदिवस काम करणार आहोत असेही हाके म्हणाले. माळेगाव निवडणुकीत आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र एवढ्या साध्या निवडणुकीत अजित पवार यांना शोभतं का? हा माझा सवाल आहे असे हाके म्हणाले. मी एका मेंढपाळाचा मुलगा आहे आम्हाला धमक्या द्यायच्या भानगडीत कोणी पडू नये. तुम्ही आमच्या केसाला धक्का लावून दाखवा. मग या महाराष्ट्रातलं काय वातावरण असतं, ते दाखवू. तुमच्या धमक्यांना आमचा ओबीसी बांधव भीक घालत नाही असेही हाके म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
पैसा कमावणे हाच अजित पवारांचा एकमेव उद्देश, त्यांनी एखादा व्यवसाय करावा, हाकेंचा पुन्हा हल्लाबोल
आणखी वाचा