
ड्युटी जॉइन केलीच नाही!
शहाना सोमवारी सर्जरी आयसीयूमध्ये नाईट ड्युटी जॉईन करणार होती, मात्र ती ड्युटीवर आलीच नाही. एका सहकाऱ्यानं तिला फोन केला असता त्याला उत्तर मिळालं नाही. नंतर तिचे अन्य सहकारी फ्लॅटवर पोहोचले असता त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचं दिसलं. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. दरवाजा तोडला असता ती आत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.






