
Disturbing Video Of Wedding: उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका लग्नसोहळ्यात रोटी तयार करताना कर्मचारी चक्क तयार होणाऱ्या रोट्यांवर थुंकत असल्याचं कॅमेरामध्ये कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. हा सारा प्रकार भोजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. हा व्हिडीओ मंगळवारपासून व्हायरल होत असून या प्रकरणी अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांना जाग
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये लग्नातील जेवणामधील रोटी तयार करण्यासाठी पीठ मळताना कर्मचारी या पीठावर थुंकत असल्याचं दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली आणि त्यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
कठोर शिक्षेची मागणी
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन रोट्यांच्या पिठात थुंकणाऱ्याला अटक केली आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून या आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. तुम्हीच पाहा हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ…
गाजियाबाद से हैरान करने वाला मामला
शादी समारोह में रोटी पर थूक लगाने का वीडियो
तंदूर के पास आटे की लोई पर थूकता दिख रहा युवक
थाना भोजपुर क्षेत्र का बताया जा रहा है वायरल वीडियो
सोशल मीडिया पर तेजी से वायरल, जांच में जुटी पुलिस#Ghaziabad @ghaziabadpolice pic.twitter.com/xmEjcYatDS
— News1India (@News1IndiaTweet) March 4, 2025
अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख पटली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारी रोजी हा सारा किळसवाणा प्रकार घडला आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा नाव फरमान असं आहे. या प्रकरणाचा सध्या पोलीस सविस्तर तपास करत आहे. यापूर्वी आरोपीने असा प्रकार केला आहे का? तो कधीपासून असे प्रकार करतोय याबद्दल चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी यासंदर्भातील स्पष्टीकरणाचा व्हिडीओ जारी केला आहे.
उक्त प्रकरण के संबंध में कृत पुलिस कार्यवाही से सम्बन्धित, सहायक पुलिस आयुक्त मोदीनगर की वीडियो बाइट। pic.twitter.com/zU4rKJ55Hu
— DCP RURAL COMMISSIONERATE GHAZIABAD (@DCPRuralGZB) March 4, 2025
ढाब्यावरचा असाच एक व्हिडीओही झालेला व्हायरल
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये अशाच व्हिडीओ व्हायरल जाला होता. त्यावेळी उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथील ढाब्यावर रोटी बनवताना पिठात थुंकणारा कर्मचारी कॅमेरात कैद झालेला. या व्हिडीओमध्ये रोटी तंदूरमध्ये टाकण्याआधी हा कर्मचारी त्यावर थुंकताना दिसत होता. हा व्हिडीओ खाली पाहू शकता…
थूक वाली रोटी…
बाराबंकी में सड़क किनारे इरशाद उर्फ इब्राहिम का ढाबा है। इरशाद तंदूर में रोटी डालने से पहले थूक लगाता था।
कुछ लोगों ने चोरी छिपे वीडियो बना लिया।
जांच क बाद ढाबे को सीज कर दिया गया है। पुलिस ने इरशाद का हिरासत में लिया है। #barabanki #barabankipolice… pic.twitter.com/XZ5hy0XuAy
— Vinay Saxena (@vinaysaxenaj) October 23, 2024
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सदर ढाबा सील करण्यात आला होता.







