सहा दिवस उलटूनही ‘तारक मेहता…’मधील ‘सोढी’ फेम अभिनेता गुरुचरण सिंह सापडेना! शेवटी कुठे गेला होता?

0
16
सहा दिवस उलटूनही ‘तारक मेहता…’मधील ‘सोढी’ फेम अभिनेता गुरुचरण सिंह सापडेना! शेवटी कुठे गेला होता?


अभिनेता गुरचरण सिंह बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याला २२ एप्रिलला दिल्ली विमानतळावर जायचे होते, असे म्हटले जात आहे. त्याच दिवशी त्याला दिल्लीहून मुंबईला जाण्यासाठी विमान पकडायचे होते, पण तो विमानतळाच्या दिशेने गेला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये, अभिनेता दिल्लीतील पालमसह इतर अनेक भागात पाठीवर बॅग घेऊन फिरताना दिसला होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी अभिनेता गुरुचरण याने त्याच्या दिल्लीतील घरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एटीएममधून ७ हजार रुपये काढले होते. त्यानंतरच त्याचा फोन बंद येऊ लागला. म्हणजेच २४ एप्रिलपर्यंत अभिनेता दिल्लीतच होता आणि त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. याचाच अर्थ २४ तारखेला गुरुचरण हा त्याच्या पालम येथील घरापासून २ ते ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या जागी उपस्थित होता.



Source link