
विधानसभा निवडणूक २०२४ साठी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापुरात नाट्यमय घडामोडी घडत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरिमा राजे यांनी अचानक उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने काँग्रेस निवडणुकीआधीच चितपट झाली आहे. शाहू महाराज मधुरिमाराजेंना सही कर असे सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर सतेज पाटील मला तोंडघशी का पाडलात, दम नव्हता तर लढायचे नव्हते, मी माझी ताकद दाखवली असते. मला कशाला तोंडघशी पाडले, हे बरोबर नाही महाराज, असे म्हणताना दिसत होते. यावरून सतेज पाटलांनी शाहू महाराजांचा अपमान केला व शाहू महाराज काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देणार असे बोलले जात आहे. यावर शाहू महाराजांनी निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.




