Satara News : सातारा जिल्ह्यातील कराड ( Satara Karad) तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. शेतात पाईपलाईनचे काम करताना दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. मातीच्या ढिगार्याखाली सापडून या दोघांचा मृत्यू झाला आहे. कराड तालुक्यातील उंडाळे इथं ही दुर्दैवी घटना घडली आहे.
दक्षिण मांड नदीच्या शेजारी संगम शिवारात शेतातील पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असताना दुर्घटना
कराड तालुक्यातील उंडाळे मनव मार्गांवर दक्षिण मांड नदीच्या शेजारी संगम शिवारात शेतातील पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. करण बाजीराव चव्हाण व अमर रंगराव वडार असे मृत्यू झालेल्या मजुरांचे नाव आहे. दोघेही मनव गावचे रहिवासी असून श्रीरंग पाटील यांच्या शेतात पाईपलाईन टाकण्याचे काम करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोन्ही मुजरांचे मृतदेह उंडाळे ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहेत.
अहिल्यानगरमध्ये चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू
अहिल्यानगरच्या कर्जत-श्रीगोंदा महामार्गावरील कोंभळी फाटा येथे चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जळगाव येथील श्रावण सुखदेव पठारे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान कोंभळी फाटा चौक हा मृत्यूचा सापळा बनला असून येथे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे येथील रहिवाशी देखील भीतीच्या छायेत असून आता ग्रामस्थांकडून तातडीने उड्डाणपूल उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळील औसा-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू तर, दोघे गंभीर जखमी
लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळील औसा-तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे.भरधाव बीएमडब्ल्यू कारने लाकडाची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला मागील बाजूने धडक दिली. या घटनेत कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती कळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य करून जखमींना रुग्णालयात हलवले. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
आणखी वाचा






