
वडेट्टीवार म्हणाले की, साधारणपणे कार्डिएक सुविधा असलेल्या एका ॲम्बुलन्सची किंमत ५० लाखाच्या आसपास असते. १,५२९ ॲम्बुलन्सचे प्रति अँम्ब्युलन्स ५० लाख या प्रमाणे एकूण ७६४ कोटी ५० लाख रूपये होतात. जवळपास ८०० कोटी रूपयात होणाऱ्या या कामावर हे सरकार ८ हजार कोटी खर्च करणार आहे. या टेंडरप्रमाणे ठेकेदाराला दर महिन्याला ७४ कोटी रूपये देण्याची सरकारची तयारी आहे. अशी रक्कम ठेकेदाराला दर महिन्याला १० वर्षापर्यंत देण्यात येणार आहे. या प्रकाराचा ठेका राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच देण्यात आला आहे.







