शरद पवार गटाला मोठा धक्का, घनसावंगीतून राजेश टोपे पराभूत, शिंदेच्या उमेदवारचा अवघ्या २३०९ मतांनी विजय

0
6
शरद पवार गटाला मोठा धक्का, घनसावंगीतून राजेश टोपे पराभूत, शिंदेच्या उमेदवारचा अवघ्या २३०९ मतांनी विजय


Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी अत्यंत धक्कादायक ठरला. या निवडणुकीत महाविकास आघडीला अपेक्षाप्रमाणे कामगिरी करता आली नाही. यातच शरद पवार गटातील मोठे नेते राजेश टोपे यांचा पराभव झाल्याची माहिती समोर आली. राजेश टोपे हे घनसावंगी येथून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शिंदे गटाने त्यांच्याविरोधात उधन हिकमत बलिराम यांना उमेदवारी जाहीर केली होती, ज्यांनी अवघ्या २ हजार ३०९ मतांनी राजेश टोपे यांना पराभवाची धुळ चाखली. राजेश टोपे यांचा पराभव शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.



Source link