
Gurugram Crime News : व्हेटिंलेटरवर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. गुरुग्राम मधील एका नामांकित रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना जेव्हा घडली तेव्हा दोन परिचारिका देखील अति दक्षता विभागात उपस्थित होत्या. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या जबाबावरून सदर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत महिला ही एअर हॉस्टेस म्हणून काम करते. मूळची पश्चिम बंगालची राहणारी ही महिला एका कंपनीत एअर होस्टेस आहे. ती कंपनीच्या वतीने प्रशिक्षणासाठी गुरुग्रामला आली होती
दरबारीपूरजवळ त्याचे एक महिन्याचे प्रशिक्षण चालू होते. पीडिता गुरुग्राममधील सेक्टर-15 येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती. पीडित महिला हॉटेलमधील स्वीमिंगपुल मध्ये पोहण्यासाठी गेली होती. मात्र, तिला अचानक अस्वस्थ वाटल्याने ती नजीकच्या रुग्णालयात दाखल झाली. मात्र, तिची प्रकृती आणखी बिघडल्याने तिला दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
6 एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ही महिला व्हेंटिलेटरवर होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, ही महिला घरी परतली, तेव्हा तिने तिच्या पतीला या घटेनबाबत सांगितले. 14 एप्रिल रोजी पतीने 112 क्रमांक डायल करुन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गुरुग्राम पोलिसांनी सांगितले की, रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. पोलिस पथक लवकरच या प्रकरणातील आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करेल. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान, ज्या रुग्णालायात ही घटना घडली त्या रुग्णालयाने निवेदन जारी केले आहे. रुग्णाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत असे रुग्णालयाने निवेदनात म्हटले आहे..