
लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांविरुद्ध आज कडक कारवाई करण्यात आली. काँग्रेसच्या ९ खासदारांसह एकूण १४ खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. डीएमकेचे खासदार कनिमोझी आणि प्रतिभन यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. त्याचशिवाय सीपीआयच्या एका खासदारालाही निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये टीएन प्रतापन, हिबी ईडन, एस ज्योतिमणि, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस आदिंचा समावेश आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या मणिकम टागोर, वीके श्रीकंदन यांच्यावरही कारवाई केली आहे.








