काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दुष्काळ, पाणी टंचाई, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. आता निवडणुका संपल्यानंतरही शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना झालेल्या नाहीत. DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणारी खते, बियाणे, औषधे दिलेली नाहीत. टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आले. सरकारने राज्यात टँकर माफिया तयार केले आहेत. त्यामुळे महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे केली आहे.





