मोठी बातमी! ‘ऑनलाइन टास्क’द्वारे फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी पिंपरी पोलिसांनी केली जेरबंद, तब्बल २०० कोटींची फसवणूक

0
24
मोठी बातमी! ‘ऑनलाइन टास्क’द्वारे फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी पिंपरी पोलिसांनी केली जेरबंद, तब्बल २०० कोटींची फसवणूक


Pune online task fraud : हॉटेल आणि उपहारगृहाला रिव्ह्यू, रेटिंग देण्याची नोकरी असल्याच्या बहाण्याने वेगवेगळे ऑनलाइन टास्क देऊन कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखा युनिट ४ च्या पोलिसांनी केला. या प्रकरणी तब्बल १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल १७ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी ९५ बनावट बॅंक खात्यांमधून २०० कोटींचे व्यवहार करत फसवणूक करण्यात आली आहे. पुण्यातील फसवणूक झालेल्या नागरिकांची तब्बल साडेतीन कोटींची फसवूक करण्यात आली असून पोलिसांनी आरोपींची खाती गोठवली आहे.



Source link