
JDU Minister Ratnesh Sada accident news : बिहारमधील सहरसा जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक मोठी घटना घडली. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात मंत्री रत्नेश सदा हे मॉर्निंग वॉक घेत असताना त्यानं भरधाव रिक्षाने धडक दिली आहे. या अपघातात रत्नेश सदा हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत रत्नेश सदा यांच्यासह त्यांचे चार अंगरक्षक देखील जखमी झाले आहेत. सदा यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली आहे. महिशी पोलीस स्टेशन हद्दीतील बलिया सिमर गावाजवळ पहाटे ५ वाजता ही घटना घडली आहे.