‘मृत्यूनंतर काय होते’, इंटरनेटवर सर्च करून नागपूरमधील मुलीची आत्महत्या; ऑनलाइन मागवले होते मृत्यूचे सामान

0
19
‘मृत्यूनंतर काय होते’, इंटरनेटवर सर्च करून नागपूरमधील मुलीची आत्महत्या; ऑनलाइन मागवले होते मृत्यूचे सामान

नागपूरमध्ये एका १७ वर्षीय तरुणीने गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याआधी तिने इंटरनेटवर ‘मृत्यूनंतर काय होते’ याचा शोध घेतला होता. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. एका खासगी शाळेत बारावीत शिकणारी ही मुलगी तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील नागपुरातील रिझर्व्ह बँकेत प्रादेशिक संचालक पदावर कार्यरत आहेत. वडिलांच्या म्हणण्यानुसार, ती अनेकदा इंटरनेटवर मृत्यू आणि परदेशी संस्कृतीबद्दल सर्च करत असे.

Source link