
रूमी जाफरी7 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक
‘दीवाना’ चित्रपटाचे हेच ते पोस्टर, ज्यात दिव्या भारती यांच्यासोबत रणदीप आर्या आहे. मात्र, चित्रपटात मुख्य भूमिका शाहरुख खान यांनी केली होती.
‘दीवाना’ सुपरहिट झाल्यावर त्यातील कलाकारांना जी ट्रॉफी मिळाली, त्यावरचा फोटो म्हणजे तेच पोस्टर आहे, जे रणदीप आर्या आणि दिव्या भारती यांच्या फोटोशूटचे होते. हे पोस्टर लोकांना इतकं आवडलं की राज कंवर यांनी त्या चित्रपटाच्या शीर्षक गीताच्या शेवटी शाहरुख खान यांना घेऊन तशाच पोजचं चित्रीकरण केलं.
भारतीय चित्रपटांच्या इतिहासात असंख्य चित्रपट तयार झाले. मोठमोठे ब्लॉकबस्टर चित्रपट लोकांच्या लक्षात राहतात, पण त्यामागील किस्से एक तर लोकांच्या लक्षात राहत नाहीत किंवा ते लोकांसमोर येत नाहीत. आज मी तुम्हाला जो किस्सा सांगणार आहे, तो हिंदी चित्रपटसृष्टीतील एका सुपरस्टारचा आहे, ज्याला लोक बादशाह खानच्या नावाने ओळखतात. हा सुपरस्टार म्हणजे शाहरुख खान. त्यांचा पहिला चित्रपट होता ‘दीवाना’. गुड्डू धनोआ, राजू कोठारी आणि ललित कपूर या तिघा भागीदारांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली होती. राज कंवर यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट होता. यामध्ये दिव्या भारती, ऋषी कपूर आणि शाहरुख खान होते. आजपासून बरोबर ३१ वर्षांपूर्वी, म्हणजे २५ जून १९९२ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
शाहरुखच्या आधी या चित्रपटात निर्माता-दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा पुत्र अरमान कोहलीला घेण्यात आले होते. पण, अरमानच्या वडिलांची म्हणजेच राजकुमार कोहलींची अट होती की, अरमानला घेऊन ते ज्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत, तो आधी प्रदर्शित होईल. दुसरीकडे, ‘दीवाना’च्या निर्मात्यांनी सांगितले की, आम्ही दिव्या भारती आणि ऋषी कपूर यांच्या तारखा आधीच घेऊन ठेवल्या आहेत. त्यामुळे आमचा चित्रपट आधीच तयार होईल, मग आम्ही तुमच्या चित्रपट प्रदर्शनाची वाट कशाला बघायची? आम्ही चित्रपट प्रदर्शित करू. त्यामुळे अरमान कोहलीने हा चित्रपट केला नाही आणि त्यानंतर शाहरुख खानला त्यात घेण्यात आले.
शाहरुख खान यांनी ‘हो’ म्हणेपर्यंत दिव्या भारती यांच्या फोटोसेशनच्या तारखा आल्या होत्या. आता नायकाशिवाय फोटोसेशन कसे करायचे? हा निर्माते-दिग्दर्शकांसमोर प्रश्न होता. गुड्डू धनोआ यांच्या पत्नी संतोष यांनी पोस्टरची एक संकल्पना मांडली, ज्यामध्ये नायकाचा चेहरा दिसणार नाही आणि पोस्टरदेखील खूप सुरेख असेल. चेहरा दिसणार नाही, तरी फोटो सेशनसाठी मुलगा हवाच. आता तो मुलगा कोण असेल आणि कुठून येणार, हा प्रश्न होता. तर गुड्डू धनोआ यांनी जो मुलगा शोधला तो धर्मेंद्र यांचे नातेवाईक वीरेंद्र यांचा मुलगा रणदीप आर्या होता. वीरेंद्र यांनी गुड्डू धनोआ यांचा ‘मेरा लहू’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. रणदीपला बोलावून त्याचे आणि दिव्या यांचे फोटोसेशन करण्यात आले. त्यानंतर शाहरुख खान यांनी हा चित्रपट साइन केला. पुढे काही दिवसांत हा चित्रपट तयार झाला. आजवरच्या संस्मरणीय चित्रपटांपैकी एक असलेला हा ‘दीवाना’ खूप यशस्वी चित्रपट ठरला. त्याची गाणीही सुपरहिट झाली. ऋषी कपूर, दिव्या भारती आणि शाहरुख खान यांचा अभिनय, राज कंवर यांचे दिग्दर्शन हे सगळेच सुपरहिट होते.
या साऱ्यामध्ये एक गोष्ट मात्र बदलली नाही, ती म्हणजे रणदीप आर्या आणि दिव्या भारती यांचे फोटोसेशन केलेले ते पोस्टर. चित्रपट सुपरहिट झाल्यावर त्यातील कलाकारांना जी ट्रॉफी मिळाली, ती आज त्या प्रत्येकाच्या घरात आहे. पण, त्यावरचा फोटो म्हणजे तेच पोस्टर आहे, जे रणदीप आर्या आणि दिव्या भारती यांच्या फोटोशूटचे होते. त्यानंतर रणदीप आर्याने प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती भटनागरसोबत लग्न केले. ते पोस्टर लोकांना इतकं आवडलं की राज कंवर यांनी त्या चित्रपटाच्या शीर्षक गीताच्या शेवटी शाहरुख खान यांना घेऊन तशाच पोजचं चित्रीकरण केलं. ते आपल्याला गाण्यामध्ये पाहायला मिळतं.
एक प्रसिद्ध शेर आहे…
क़िस्मत का लिखा तो मुझे ख़ुद ही मिलेगा आक़ा वो दीजिए मुझको जो मेरी क़िस्मत में ना हो। अरमान कोहलीचा चित्रपट शाहरुख खान यांना मिळण्याच्या घटनेमुळे या ओळींना सार्थ ठरतात. ‘दीवाना’ चित्रपटाशी संबंधित किश्श्यांबद्दल बोलायचे तर प्रत्येक किस्सा खूपच खास आहे. पण, मला आणखी एक किस्सा आठवतोय, जो अतिशय मनोरंजक आणि रोमांचकही आहे. ‘दीवाना’चे चित्रीकरण मढ आयलँड इथे सुरू होते. गुड्डू धनोआ हे त्यांच्या अॅक्शनसाठी ओळखले जात होते. जसे रोहित शेट्टी आजच्या चित्रपटांमध्ये अॅक्शनसाठी ओळखले जातात, तसेच गुड्डू धनोआही ९० च्या दशकात त्यांच्या अॅक्शनसाठी प्रसिद्ध होते. गुड्डू धनोआ हे धर्मेंद्र यांचे नातेवाईक आणि खूप मोठे दिग्दर्शक आणि निर्मातादेखील आहेत. ते स्वत:जवळ नेहमी परवाना असलेली रिव्हॉल्व्हर ठेवायचे. एके दिवशी चित्रीकरणादरम्यान दिव्या भारतींना संधी मिळाली आणि त्यांनी गुड्डू धनोआ यांची रिव्हॉल्व्हर काढली. ही चित्रीकरणासाठीची खोटी रिव्हॉल्व्हर आहे, असंच दिव्या समजत होत्या. दुसरीकडे, गुड्डू धनोआ दिव्या यांना वारंवार सांगत होते की ही खरी रिव्हॉल्व्हर आहे. परंतु, मुळातच खोडकर असलेल्या दिव्या रिव्हॉल्व्हर घेऊन हसत गुड्डू धनोआंना चिडवण्यासाठी सारखं विचारत होत्या, ‘चालवू का..? चालवू..?’ गुड्डू धनोआंनी खूपदा सांगूनही त्या काही ऐकत नव्हत्या. आता दिव्या ट्रिगर दाबणार असं गुड्डू यांना दिसताच त्यांनी विजेच्या वेगाने दिव्या यांचा हात वर केला आणि एकदम एक गोळी झाडली गेली, ती थेट मढ आयलँडच्या आकाशात उडाली.
या घटनेमुळे दिव्या आणि गुड्डू धनोआ यांनाही खूप धक्का बसला. अर्धा तास दिव्या नुसत्या गप्प बसून राहिल्या, कोणाशी काहीही बोलल्या नाहीत. आता तुम्हीच विचार करा, गुड्डू धनोआ यांनी योग्य वेळी दिव्या यांचा हात वर केला नसता, तर किती मोठी दुर्घटना घडली असती. गुड्डू धनोआ यांचे तारतम्य आणि तत्परतेमुळे एक मोठा दुर्घटना घडता घडता टळली होती.
तेव्हा मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. योग्य वेळी शहाणपण आणि विवेकाचा वापर केल्यास मोठी दुर्घटना टळू शकते. तुम्हाला माझ्या हिश्श्याचा हा किस्सा आवडला असेल, तर दिव्या भारती यांच्या आठवणीत, त्यांच्या ‘दीवाना’मधील हे गाणे
नक्की ऐका…
ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं, मैंने इसलिए…
जाने जाना दीवाना… तेरा नाम रख दिया।
स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.
रूमी जाफरी बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक