माझ्या हिश्श्याचे किस्से: ज्युनियर मेहमूदसाठी राजेश खन्ना यांनी अॅडजस्ट केल्या होत्या शूटिंगच्या तारखा!

0
15
माझ्या हिश्श्याचे किस्से: ज्युनियर मेहमूदसाठी राजेश खन्ना यांनी अॅडजस्ट केल्या होत्या शूटिंगच्या तारखा!


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Purvani Mazya Hishshyache Kisse Written By Rumi Jaffrey On Rajesh Khanna And Junior Mehmood

रूमी जाफरी5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

राजेश खन्ना यांच्यासमवेत ज्युनियर मेहमूद. 

अलीकडेच, चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार ज्युनियर मेहमूद यांचे निधन झाले. या सदराच्या बऱ्याच वाचकांनी, मी ज्युनिअर मेहमूद यांच्याविषयी लिहावे, असा आग्रह केला. म्हणून आजचा भाग ज्युनियर मेहमूद यांच्यावर…

मी त्यांच्यासोबत “आजमाइश’ या एकाच चित्रपटात काम केले. शूटिंगपूर्वी त्यांच्याशी भेट झाली आणि नंतर प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळी. पुढे दोन-तीन वेळा जॉनी लिव्हर आणि सचिनजी (सचिन पिळगावकर) यांच्या घरी भेटीगाठी झाल्या. ज्युनियर मेहमूद यांचे मूळ नाव नईम होते. शूटिंगच्या वेळी मी त्यांना, फिल्म इंडस्ट्रीत पहिला ब्रेक कसा मिळाला, असे विचारले. त्यावर ते म्हणाले, “माझा मोठा भाऊ फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टील फोटोग्राफर होता. तो शूटिंगच्या वेळी फोटो काढायचा आणि घरी आल्यावर सांगायचा की, आज मी अमुकतमुक अभिनेत्याचा फोटो काढला. मग मी मला शूटिंग बघायचंय म्हणून भावाच्या मागे लागायचो. अखेर एकेदिवशी भाऊ मला शूटिंग दाखवायला घेऊन गेला.

अजिबात आवाज करायचा नाही, शांत उभं राहायचं, अशी ताकीद त्याने मला आधीच दिली होती. तेव्हा मी ८-९ वर्षांचा असेन. तिथे पाहिले की, जॉनी वॉकर अंकल शिक्षक बनले होते आणि काही मुलांसोबत त्यांचा सीन सुरू होता. त्यातील एक मुलगा वारंवार डायलॉग विसरत होता आणि वारंवार री-टेक होत होते. असे खूप सारे री-टेक झाले. सगळे वैतागले होते. पुन्हा एकदा री-टेक झाला, त्यावेळी मी बोलून गेलो की, काय एवढासा डायलॉग नाही म्हणता येत? यापेक्षा चांगला तर मी म्हणू शकतो. सगळे जण माझ्याकडे बघू लागले. आता आपली नोकरी जाणार म्हणून माझ्या भावाने डोक्याला हात लावला. माझ्याकडे पाहून दिग्दर्शकाने विचारले, ‘अच्छा.. तू या मुलाचा डायलॉग म्हणू शकतोस?’ मी म्हणालो, “या मुलाचाच काय, ते अंकल जे बोलत आहेत, तेदेखील म्हणू शकतो.’ दिग्दर्शक हसू लागले. मग जो मुलगा वारंवार डायलॉग विसरत होता, त्याचा शर्ट मला देत म्हणाले, ‘हा शर्ट घाल आणि इथं उभा राहून डायलॉग म्हण.’ ईश्वराच्या कृपेने मी असे काही एकाच झटक्यात बोललो की एकाच टेकमध्ये शॉट ओके झाला. टाळ्या वाजल्या. तेव्हा मला त्या डायलॉगसाठी पाच रुपये मिळाले होते.’

ज्युनियर मेहमूद सांगत होते.. ‘त्यावेळी मला जणू जग जिंकल्यासारखे वाटत होते. ही माझी सुरूवात होती. पुढे एक दिवस दिग्दर्शक रंजन भट्टाचार्य यांच्याकडून मला ऑफर आली. ते ‘सुहागरात’ नावाचा एक सिनेमा बनवत होते. त्यामध्ये मेहमूद भाईजान यांच्यासोबत माझा एक रोल होता. शूटिंग सुरू असताना मला मेहमूद भाईजान यांचा खूप जवळून सहवास लाभला. मला नेमके आठवत नाही, पण त्यांची मुलगी जिन्नीचा वाढदिवस की बारसे असा काहीतरी सोहळा होता. त्यासाठी त्यांनी सर्वांना आमंत्रण दिले, पण मला मात्र बोलावले नाही, याचे खूप वाईट वाटले. मी मेहमूद भाईजानना म्हणालो की, तुम्ही सगळ्यांना बोलावले, पण मला नाही. कारण मी काहीच नाही ना? ते हसायला लागले. माझ्याकडे प्रेमाने पाहात म्हणाले, ‘मी तुलाही बोलावले असते, पण मोठ्यांच्या मध्ये तू काय करणार?’ यावर मी म्हणालो, ‘मी डान्सचा असा आयटम सादर करेन की तुमचे पाहुणे वेडे होतील.’ ते हसले आणि म्हणाले, “ठीक आहे, तू पण ये.’

‘त्या दरम्यान मी शाळेतील एका मुलीसोबत १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी रफी साहेबांच्या “हम काले है तो क्या हुआ दिलवाले हैं..’ या गाण्यावर डान्स बसवला होता. मी माझ्या वडिलांना आणि त्या मुलीला सोबत घेऊन मेहमूद भाईजान यांच्या घरी पोहोचलो. मी मेहमूद भाईजान यांचा फुल गेट अप केला, त्या मुलीला हेलन बनवले आणि संपूर्ण गाणे सादर केले. ते पाहून सगळे पाहुणे खुश झाले. मेहमूद भाईजान यांनी तर मला कडेवर उचलून घेतले. माझ्या वडिलांना ते म्हणाले, ‘याच्यात खूप मोठा कलाकार दडलाय. याला माझ्याकडे घेऊन या. मी याला शिकवेन आणि माझे नावही देईन.’ काही दिवसांनी वडील मला स्टुडिओत घेऊन गेले. तिथे मेहमूद भाईजान यांनी मला खरोखर गंडा बांधला, ते माझे गुरू झाले. मी त्यांना सव्वापाच रुपये गुरुदक्षिणा दिली, मिठाई खाऊ घातली. त्यांनी त्यादिवशी माझे नामकरण केले. म्हणाले, ‘आजपासून तुझे नाव नईम नव्हे, ज्युनियर मेहमूद असेल.’ त्यांच्या रूपाने मला गुरू मिळाले होते, त्यांनी आपले नावही मला दिले होते. त्यानंतर मला “ब्रह्मचारी’ हा सिनेमा मिळाला. त्यामध्ये खूप मुले होती. पण, मी सेटवर सगळ्यांना ‘हम काले हैं तो क्या हुआं..’वर डान्स करून दाखवायचो. सिनेमाचे दिग्दर्शक बप्पी सोनी यांनी मला पाहिले आणि त्याच वेळी हे गाणं सिनेमात घ्यायचा निर्णय घेतला.’ बप्पी सोनी यांनी स्वत: हे गाणं चित्रीत केले.एक ग्रामोफोन लावून त्यावर ते वाजवले. बप्पीजींनी या गाण्याचं चित्रीकरण सिनेमाच्या पद्धतीने अजिबात केलं नाही. त्यांनी नृत्य दिग्दर्शकालाही बोलावले नाही. मला एवढंच म्हणाले की, तू सगळ्यांंना जसं करून दाखवतोस ना अगदी तसंच कर. आणि गाण्याचे शूटिंग झाले. त्यानंतर मी बप्पीजींना म्हणालो की, मी ऑर्केस्ट्रात एक आयटम पाहिलाय, तुम्हाला करून दाखवू? त्यावर त्यांनी ते करुन दाखवायला सांगितलं. मी म्हणालो की, एका लोणचं विकणाऱ्याच्या पोटात उंदीर शिरतो आणि तो बोलताना उचक्या देत देतच बोलत असतो. नंतर मी त्याच पद्धतीने डायलॉग म्हणून दाखवला. त्यावर बप्पीजी खूप हसले आणि त्यांनी मला त्याच पद्धतीने डायलॉग म्हणायला सांगितले. त्या गाण्यामुळे आणि उचकीवाल्या डायलॉगमुळे माझे पात्र इतके हिट झाले की मग मागे वळून पाहण्याची गरजच पडली नाही.’

काल जेव्हा मी सचिनजींना फोन केला आणि त्यांच्याशी बोललो, तेव्हा त्यांनी सांगितले की, रूमीभाई, ‘ब्रह्मचारी’नंतर ज्युनियर मेहमूद इतके मोठे स्टार झाले होते की, तेव्हापासून आजपर्यंत तेवढा मोठा चाइल्ड स्टार झाला नाही. १९६० च्या दशकात त्यांनी ७० हजार आणि एक लाख रुपयांपर्यंत मानधन घेतले. हा पहिला चाइल्ड आर्टिस्ट होता, ज्याच्याकडे इम्पाला कार होती. यावरून मला निदा फाजलींचा एक शेर आठवतोय…

बच्चों के छोटे हाँथों को चाँद सितारे छूने दो,
चार किताबे पढ़कर ये भी हम जैसे हो जायेंगे।

सचिनजी पुढे सांगत होते.. ज्युनियर मेहमूद प्रत्येक सिनेमात असायचे. मग तो हॉरर, रोमँटिक, कॉमेडी, सोशल, अॅक्शनपट असो की ड्रामा असो; सगळ्यांना ज्युनिअर मेहमूदच हवे असायचे. नायक राजेश खन्ना, शम्मी कपूर, धर्मेंद्र, दारा सिंग, शशी कपूर वा कोणीही असो; त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीवर काही फरक पडत नव्हता. अनेकदा त्यांच्या तारखा मिळवताना अडचण यायची. जे. आेमप्रकाश ‘आन मिलो सजना’ हा सिनेमा बनवत होते. त्यामध्ये राजेश खन्ना, आशा पारेख आणि ज्युनियर मेहमूद होते. तेव्हा राजेश खन्ना आणि ज्युनियर मेहमूद यांच्या तारखांची मोठी समस्या उभी राहिली होती. तारखा अॅडजस्ट होत नसल्याने जे. आेमप्रकाशजी ज्युनियर मेहमूदना म्हणाले की, राजेश खन्ना सुपरस्टार आहेत, तर तू तारखा अॅडजस्ट कर. त्यावर ज्युनियर मेहमूद म्हणाले, ‘काकाजींना सांगा, त्यांच्यापेक्षा जास्त चित्रपट मी करतो आहे आणि त्यांच्यापेक्षा चांगला डान्सरही आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या तारखा अॅडजस्ट कराव्यात.’ राजेश खन्ना यांना हे समजले तेव्हा ते खूप हसले आणि म्हणाले, ‘मी या मुलाच्या बोलण्यावर खूप खूश झालोय. असू दे, मी माझ्या सारखा अॅडजस्ट करतो.’ आणि मग राजेश खन्ना यांनी आपल्या तारखा बदलल्या. सचिनजी म्हणाले, ज्युनियर मेहमूद हे खूप चांगले डान्सर होते. त्यांच्या स्मरणार्थ, सचिनजी आणि ज्युनियर मेहमूद यांच्यावर चित्रीत केलेले ‘बचपन’ सिनेमातील हे गाणं ऐका…

पर्दा उठने वाला है, तमाशा होने वाला है
कोई हंसने वाला है, कोई रोने वाला है…
स्वत:ची काळजी घ्या आणि आनंदी राहा.

(लेखक-बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक)



Source link