
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आता काही महिन्य़ाचा काळ शिल्लक राहिला आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीच दिल्लीतील राजकीय वातावरण कमालीचे तापलं आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांनी एक्स वर पोस्ट करताना भाजपवर लोकांची मते कापण्याचा आरोप केला. त्याचबरोबर हरयाणा आणि महाराष्ट्रात भाजपचा विजय म्हणजे षडयंत्र असल्याचे म्हटले. एक्सवरील पोस्टमध्ये अरविंद केजरीवाल यांनी याबाबत मोठा खुलासा करणार असल्याचे म्हटले आहे.







