
Mahakumbh Prayagraj : प्रयागराज महाकुंभात आतापर्यंत २० कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र गंगा स्नान केले आहे. बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी १० कोटी भाविकांनी स्नान केल्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती विभागाने बुधवारी दुपारपर्यंतच्या आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, आतापर्यंत ५.७१ कोटी लोकांनी संगमात डुबकी मारली आहे, तर २८ जानेवारीपर्यंत एकूण आकडा १९.७४ कोटी झाला आहे.







