
पुण्यातील अनेक हॉटेल शाकाहारी व मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र पुण्यातील एक हॉटेल वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. मटणाचे तब्बल ६१ लाखाचे बिल न दिल्याचा आरोप पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलवर होत आहे. पुण्यात तब्बल ६१ लाख रुपयांची मटणाची उधारी न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका प्रसिद्ध हॉटेलच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







