आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचे उपांत्य सामनेरंगत असताना भारत मात्र अंतिम चारमध्ये पोहोचूशकलेला नाही. चाहत्यांसाठी ही निश्चितचनिराशाजनक बाब आहे. गेल्या दोन आठवड्यांतीलभारतीय संघाच्या कामगिरीकडे पाहिले तर संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरला नाही, हे वास्तव स्वीकारावेलागेल. एखाद-दुसऱ्या खेळाडूने चांगली कामगिरीकेली, पण संघ म्हणून सातत्यपूर्ण खेळ दिसला नाही.ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांतयाची मोठी किंमत मोजावी लागली. कर्णधार हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्कृष्टखेळी केली.भारताला सामन्यात टिकवून ठेवले. मात्र,इतर सामन्यांत ती गरजेपेक्षा अधिक सावध दिसली.दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अशीच खेळी झाली असती,तर भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकला असता. हीच सातत्याची कमतरता संघाला महागात पडली. स्मृती मानधनाने दक्षिण आफ्रिका आणिऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली सुरुवात केली, पण मोठीखेळी करण्यात अपयश आले. हे दोन्ही सामने निर्णायक होते. अशा वेळी संघातील प्रमुख फलंदाज अपेक्षितयोगदान देऊ शकला नाही, ही चिंतेची बाब ठरली.जेमिमा रॉड्रिग्ज आणि यास्तिका भाटिया यांचा संपूर्णस्पर्धेतील खेळ निराशाजनक राहिला. जेमिमानेस्वतःच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करण्याची गरजआहे. तिच्याकडे गुणवत्ता असली तरी ती सातत्यानेमोठी खेळी करण्यात अपयशी ठरली आहे. 2025 च्याविश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्याशतकानंतर तिने अपेक्षित सातत्य राखलेले नाही. दीप्ती शर्माने पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेतले. मात्रत्यानंतर विशेष प्रभाव पाडता आला नाही.ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 356 वाबळी मिळवूनही त्यांचा विश्वचषक समाधानकारकठरला नाही. ऋचा घोषनेही एका चांगल्या सामन्यानंतरसातत्य राखले नाही. गोलंदाजीत चारणी वगळता इतरकोणीही निर्णायक क्षणी पुढे आले नाही. क्षेत्ररक्षणहीसंपूर्ण स्पर्धेत सरासरीपेक्षा कमी दर्जाचे राहिले. उत्कृष्टक्षेत्ररक्षक मानल्या जाणाऱ्या राधा यादवकडूनहीमहत्त्वाचे झेल सुटले. आता पुढचा मार्ग कोणता, हामोठा प्रश्न आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतसुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असेल. मात्र खरे आव्हानफेब्रुवारी 2027 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे आहे. मुख्यप्रशिक्षक अमोल मजूमदार टी-20 क्रिकेटच्यागरजेनुसार संघात कठोर निर्णय घेण्यास तयार आहेतका, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. 2024 आणि 2026या दोन्ही विश्वचषकांत गट टप्प्यातच बाहेर पडणेभारतीय संघासाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. दोनवर्षांनंतरच्या ऑलिम्पिकचा विचार करता संघाला नव्याकल्पना आणि नव्या दृष्टिकोनाची गरज आहे. अमोलमजूमदार यांच्यासाठी पुढील काही महिने अत्यंतमहत्त्वाचे असतील. दुखापतींचा फटका संघाला बसलाअसला, तरी सक्षम राखीव खेळाडू तयार ठेवणे आणिनव्या खेळाडूंना संधी देणे ही प्रशिक्षकांची जबाबदारीअसते. प्रतिभा आणि संसाधनांची कमतरता नसतानाभारताकडून अपेक्षाही मोठ्या असणार आहेत.रणनीतीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेमिमाला ‘रिटायर्ड आऊट” का केलेनाही? ऋचा घोषला वरच्या क्रमांकावर का पाठवलेनाही? तिसऱ्या क्रमांकावर सतत बदल का करण्यातआले? डावखुरा-उजव्या हाताचा फलंदाज हा एकमेवनिकष असू शकत नाही. तिसरा क्रमांक हा विशेषजबाबदारीचा असून त्या स्थानासाठी खेळाडूलासातत्याने संधी देणे आवश्यक असते. तसेच, गोलंदाजप्रेमा रावतला दोन षटकांनंतर पुन्हा गोलंदाजी का देण्यातआली नाही, याचाही उलगडा व्हायला हवा. या प्रश्नांसह भारताचा विश्वचषकातील प्रवास संपलाआहे. आता केवळ आत्मपरीक्षण नव्हे तर या प्रश्नांचीठोस उत्तरे शोधून त्यानुसार बदल अमलात आणण्याचीवेळ आली आहे. ( लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) आता भारतीय महिला संघाचे पुढीललक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्धा असेल.आशियाई स्तरावर फारशी कडवी स्पर्धानसल्याने भारताला सुवर्णपदकजिंकण्याची चांगली संधी आहे. खरे लक्षफेब्रुवारी 2027 मध्ये श्रीलंकेत होणाऱ्यामहिला चॅम्पियन्स ट्रॉफीकडे असायलाहवे.
Source link
Home महाराष्ट्र बोरिया मजुमदार यांचा कॉलम: भारतीय महिला क्रिकेट संघाने आता नव्या वाटेचा...










