
sexual harassment case : मद्रास उच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. प्रेमात असलेल्या तरुण-तरुणीने एकमेकांना मिठी मारणे किंवा चुंबन घेणे ही नैसर्गिक व स्वाभाविक गोष्ट आहे. उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना लैंगिक छळाचा आरोप असलेल्या तरुणाला या प्रकरणी दिलासा दिला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अ अन्वये त्याच्यावरील फौजदारी कारवाई रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.