
या षटकोनीला गडद राखाडी रंग देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आयफेल टॉवरचे लोखंड बसवण्यात आले आहे, तेथे इंग्रजीत ‘पॅरिस २०२४’ असे शब्द छापण्यात आले आहेत. षटकोनीच्या सहाही कोपऱ्यांवर सोनेरी रंगाची रत्ने बसवण्यात आली असून, ते पदकाच्या सौंदर्यात भर घालत आहेत.