
Nagar Urban Bank depositors Protest: नगर अर्बन बँकेतील ठेवीदारांनी काल दुपारी बँकेचे अध्यक्ष स्व. दिलीप गांधी यांच्या फोटोला चपलांचा मार दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिडशे कोटींच्या बनावट कर्ज प्रकरणांमुळे नगर अर्बन बँक अवसायानात गेली आहे. यामुळे ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी अडकल्या आहेत. यासाठी ठेवीदारांनी वारंवार आंदोलन केली. परंतु, अद्याप त्यांच्या हाती काहीच लागले नाही. यानंतर संतापलेल्या ठेवीदारांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेत बँकेसमोरील चौकात आंदोलन केली.






