धक्कादायक ! | हवालदाराच्या अवघ्या 5 वर्षांच्या मुलीवर PSI ने केला बलात्कार; पीडितेच्या आईने आरोपीला चांगलंच चोपलं | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
धक्कादायक ! | हवालदाराच्या अवघ्या 5 वर्षांच्या मुलीवर PSI ने केला बलात्कार; पीडितेच्या आईने आरोपीला चांगलंच चोपलं | Navarashtra (नवराष्ट्र)


हवालदाराच्या अवघ्या 5 वर्षांच्या मुलीवर PSI ने केला बलात्कार; पीडितेच्या आईने आरोपीला चांगलंच चोपलं

राजस्थानातील दौसा येथे एका सब इन्स्पेक्टरने पोलिस हवालदाराच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape Case) केल्याची संतापजक घटना उघडकीस आली. यानंतर लोकांनी पोलिस ठाण्यात एकच गोंधळ घातला आणि तोडफोड केली.

जयपूर : राजस्थानातील दौसा येथे एका सब इन्स्पेक्टरने पोलिस हवालदाराच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape Case) केल्याची संतापजक घटना उघडकीस आली. यानंतर लोकांनी पोलिस ठाण्यात एकच गोंधळ घातला आणि तोडफोड केली. आरोपीने स्वतःला पोलिस ठाण्यातच एका खोलीत कोंडून घेतले होते. मात्र, जमावाने पोलिस ठाण्याच्या (Jaipur Police) खिडकीची काच तोडून आरोपीला बाहेर काढले आणि मारहाण केली.

पोलिसांनी आरोपी पीएसआय भूपेंद्रसिंह याला रात्री उशिरा ताब्यात घेतले. तसेच त्याला निलंबितही करण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा या मुलीला दौसा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर दौसा एसपी वंदिता राणा यांनी सांगितले की, मुलीची प्रकृती सामान्य असून तिला गंभीर दुखापत झालेली नाही.






Source link