
दुबईला ‘सिटी ऑफ गोल्ड’ म्हणून ओळखले जाते. सोने खरेदीसाठी हे शहर भारतीयांचे आवडते ठिकाण ठरले आहे. उत्तम दर्जाची आणि कमी किमतीची गोष्ट भारताच्या तुलनेत लोकांना आकर्षित करते. पण तुम्हाला माहित आहे का दुबईहून भारतात सोनं आणण्यासाठी कायदेशीर मर्यादा आहे. भारतीय सीमा शुल्क विभाग आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी) यासाठी कडक नियम केले आहेत, जेणेकरून सोन्याची तस्करी रोखता येईल आणि देशाची आर्थिक स्थिती संतुलित राखता येईल.







