“थोडी जरी लाज शिल्लक असेल तर..”, आरोग्यमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक

0
16
“थोडी जरी लाज शिल्लक असेल तर..”, आरोग्यमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक


शनिवारी साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या घटनेसाठी आपण एकटे नाही, तर संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं. त्यावर मुंबई काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील दुरावस्थेबाबत मुंबई काँग्रेसने आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण आता माननीय आरोग्यमंत्रीच म्हणतात की, या घटनांसाठी एकटा मीच नाही, तर संपूर्ण मंत्रिमंडळच जबाबदार आहे. थोडी जरी लाज शिल्लक असेल, तर आता तरी या संपूर्ण शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा, असे प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.



Source link