
Principal Coats Classroom Walls With Cow Dung: दिल्ली विश्व विद्यालयाच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी वर्गातील भिती शेणाने सारवल्याचे प्रकरण अधिकच चिघळत चाललं आहे. मंगळवारी दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघटनेचा (DUSU) अध्यक्ष रौनक खत्री याने महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्ये ऑफिसमधील भिंतीवर शेण थापल्याचे समोर आले आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी लक्ष्मीबाई कॉलेजच्या प्राचार्य प्रत्यूष वत्सला यांनी वर्गातील भितीं शेणाने सावरल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलं होतं की हा एक प्रकारचा संशोधनाचा विषय आहे. महाविद्यालयातील शिक्षकांच्या देखरेखीखाली याचे संशोधन सुरू आहे. पारंपारिक पद्धतीने घर किंवा खोल्या थंड ठेवण्याच्याय शक्यताचा विचार केला जात आहे. ज्या लोकांकडून अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांना या प्रकल्पाबद्दल काहीच माहिती नाहीये. म्हणून त्यांना हा व्हिडिओ शेअर केला आहे.
हा संशोधनाचा विषय असून एक महिन्यानंतर या विषयावर सविस्तर माहिती देईन. तसंच, शेण नैसर्गिक असून त्याला हात लावल्यास कोणतेही नुकसान होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं.
दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष रौनक खत्री यांनी लक्ष्मीबाई कॉलेजच्या प्राचार्याच्या कार्यालयात पोहोचून भिंतीवर शेण थापले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रौनक खत्री यांनी म्हटलं आहे की, कॉलेजच्या प्राचार्यांनी वर्गात शेण थापले. त्यामुळं आम्ही त्यांच्या कार्यालयातील ऑफिसमध्ये शेण थापले. मॅडमने वर्गातील भिंती शेणाने सारवल्या आहेत तर त्यांच्या ऑफिसच्या भिंतींनाही शेण थापायला पाहिजे. जर क्लासरूम शेणामुळं थंड होऊ शकतात तर त्यांचे ऑफिसदेखील थंड होऊ शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे.
VIDEO | Delhi University Students Union (DUSU) president Ronak Khatri smears cow dung on the walls of the principal’s office at Lakshmibai College.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/by5B6msIAl
— Press Trust of India (@PTI_News) April 15, 2025
रौनक खत्री यांनी पुढे म्हटलंय की, आम्हाला आशा आहे की मॅडम त्यांच्या ऑफिसमधील एसी हटवतील. जेव्हा रौनक खत्री प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा तिथे प्राचार्य उपस्थित नव्हते. तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याही वाद झाला.








