
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच भाजपचे शेकडो कार्यकर्ते व समर्थक रेल्वे स्टेशनवर एकत्र झाले. त्यांनी संबंधित तीन आरोपींच्या अटकेची मागणी केली. वातावरण बिघडताना पाहून बेल्लारीचे पोलीस अधीक्षक बीएल श्रीहरिबाबू अनेक ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोबत घेऊन रेल्वे स्टेशनवर आले. त्यांनी सांगितले की, याप्रकरणात होसपेटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २९५ A (धार्मिक भावना दुखावणे), ५०४ (जाणून-बुझून अपमान करणे), ५०६ (जीवे मारण्याची धमकी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे.








