कुत्र्याचा इतका भयानक हल्ला तुम्ही कधीच पाहिला नसेल, तरुणीच्या तोंड, गळा आणि पायावर 50 टाके, पहा VIDEO

0
3
कुत्र्याचा इतका भयानक हल्ला तुम्ही कधीच पाहिला नसेल, तरुणीच्या तोंड, गळा आणि पायावर 50 टाके, पहा VIDEO


Pet Dog attacked on woman in Bengaluru: श्वानाने केलेल्या हल्ल्यात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तरुणी मॉर्निग वॉकनंतर घरी परतत असताना, शेजाऱ्याच्या पाळीव श्वानाने तिच्यावर हल्ला केला ज्यामध्ये ती जखमी झाली. सकाळी 6 वाजून 54 मिनिटांच्या सुमारास  हा प्रकार घडला. श्वानाने तरुणीच्या घरासमोरच तिच्यावर हल्ला केला. तरुणीच्या तोंड, गळा आणि पायावर एकूण 50 टाके मारण्यात आले आहेत. बंगळुरुत हा प्रकार घडला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा श्वान अमरेश रेड्डी नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा आहे. श्वानाने एचएसआर लेआउटमध्ये अचानक तरुणीवर हल्ला केला. त्याने तरुणीच्या मान, चेहरा, हात, पायाचा चावा घेतला. जखमा गंभीर असल्याने, तिला तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

पीडित तरुणीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिला जास्त वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचं सांगितलं. रिपोर्टनुसार, तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर 50 हून अधिक टाके घालण्यात आले आहेत. रुग्णालयातील कर्मचारी तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

या हल्ल्यादरम्यान तरुणीला वाचवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचाही कुत्र्याने चावा घेतला. त्या व्यक्तीच्या जखमांबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण दोघांवरही उपचार करण्यात आले आहेत. 

हल्ल्यानंतर महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, कुत्र्याच्या मालकावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या घटनेला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा तपास सुरू केला आहे. अधिकारी सध्या साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत आणि घटनेचा नेमका क्रम निश्चित करण्यासाठी पुरावे तपासत आहेत. कुत्र्याच्या मालकाविरुद्ध कोणती कायदेशीर कारवाई केली जाईल, हे अधिकाऱ्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.

या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे आणि अनेक जण पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेच्या उपायांवर आणि निवासी परिसरांमध्ये मालकांच्या जबाबदाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तपास सुरू असताना महिला अद्याप रुग्णालयात दाखल आहे.





Source link