
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत कार्तिक हा सतत मुक्ताच्या मागे फिरताना दिसत आहे. तो मुक्ताला वेगळ्या प्रकारे स्पर्श कर, अंधारात तिला मिठी मार अशा काही गोष्टी करताना दिसत आहे. मुक्ता सर्वांसमोर त्याचा खरा चेहरा आणण्याचा प्रयत्न करते. पण कोणीही तिचे ऐकायला तयार नाही. उलट इंद्रा आणि स्वाती मुक्तावर चिडतात. तसेच मुक्ताला तिचे तोंड बदल करण्यास सांगतात. आता मुक्ता आगामी भागात काय पाऊल उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







