
नव्या कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये :
- हा कायदा भारतीय कंपन्यांना विमान निर्मिती आणि डिझाइनमध्ये सक्षम करेल.
- यामुळे जुन्या कायद्यात २१ वेळा असलेली गुंतागुंत दूर होणार आहे.
- यामुळे भारताच्या वेगाने वाढणाऱ्या नागरी हवाई वाहतूक बाजारपेठेला नव्या उंचीवर नेण्यास मदत होईल.
- गुन्ह्यांमध्ये धोकादायकपणे विमान उडवणे, विमानात शस्त्रे किंवा स्फोटके वाहून नेणे आणि विमानतळांजवळ कचरा जमा करणे किंवा प्राण्यांची कत्तल करणे आदि प्रकरणात तीन वर्षांपर्यंत कारावास, एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
- या विधेयकात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्याशी संबंधित निर्णयांविरुद्ध दुसरे अपील करण्याची तरतूद आहे.
या कायद्यामुळे विमानांची निर्मिती, डिझाइन, देखभाल, मालकी, वापर, ऑपरेशन, विक्री, निर्यात आणि आयात यावर संपूर्ण नियंत्रण केंद्र सरकारला मिळते. विमानांशी संबंधित इतर बाबींचे नियमन आणि नियंत्रण करण्याचे अधिकार केंद्र सरकारला असतील. या कायद्यानुसार विमानांचे धोकादायक उड्डाण, विमानात शस्त्रे किंवा स्फोटके बाळगणे, विमानतळाजवळ कचरा टाकणे किंवा जनावरांची कत्तल करणे गुन्हा आहे. या गुन्ह्यांमध्ये तीन वर्षांपर्यंत कारावास, एक कोटी रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.








