‘काचा लावाsss’ कारसमोर बर्फाचे लोट येताना पाहून उडाला थरकाप; अंगावर काटा आणतोय हा व्हिडीओ

0
19
‘काचा लावाsss’ कारसमोर बर्फाचे लोट येताना पाहून उडाला थरकाप; अंगावर काटा आणतोय हा व्हिडीओ


Jammu Kashmir Sonamarg Avalanche : उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमस्खलनाची घटना ताजी असतानाच जम्मू काश्मीरमध्येही अशीच काहीशी परिस्थिती उदभवल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी जम्मू काश्मीरणधील सोनमर्ग इथं एक भयंकर हिमस्खलन झालं आणि या क्षणाची दृश्य अनेकांच्याच अंगावर काटा आणून गेली. 

सोशल मीडियावर सध्या हा हिमस्खलानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कार किंवा तत्सम वाहनासमोरून बर्फाचे लोट अतिप्रचंड वेगानं येताना दिसत आहे. काही सेकंदांच बर्फाचं हे वादळ आपल्या वाहनावर धडकणार हे ठाऊक असताना या परिस्थितीत बचाव करण्यासाठी ‘काचा बंद कराsss’ असा जिवाच्या आकांतानं या माणसांनी आरडाओरडा केला आणि तितक्यातच या हिमस्खलानं या वाहनाला विळख्यात घेतलं. सर्वत्र बर्फच बर्फ… अशीच काहीशी स्थिती या क्षणी पाहायला मिळाली. 

कधी होतं हिमस्खलन? 

प्रचंड हिमवृष्टीनंतर बर्फाच्या एका थरावर दुसरा थर साचतो तेव्हा हिमस्खलनाची घटना घडते. ही संपूर्ण प्रक्रिया नैसर्गिकरित्या होत असून, जसजसं उतारावर गुरुत्वाकर्षण वाढलं तरतसं इतरही काहीर कारणांमुळं बर्फाचे थर विरळ होऊ लागतात आणि ते गुरुत्वाकर्षनाच्या नियमानुसार अतिप्रचंड वेगानं कोसळू लागतात. हिमस्खलन नेमकं कधी आणि कुठे होईल याचे पूर्वसंकेत देता येत नसले तरीही कोणत्या ठिकाणी बर्फाचा थर विरळ झाला आहे यावरून तिथं हिमस्खलनाचा धोका आहे की नाही याचा अंदाज लावता येतो. 

देशात पश्चिमी हिमालयीन क्षेत्र हिमस्खलनाच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील असून, यामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असल्याचं म्हटलं जातं. हिमालयातील हिमस्खलनाच्या भागांना तीन श्रेणींमध्ये विभागलं जातं. ज्यामध्ये रेड झोन अति धोकादायक, ब्लू झोन त्याहून कमी धोकादायक आणि यलो झोन असं क्षेत्र असतं जिथं क्वचितप्रसंगी हिमस्खलनासारख्या घटना घडतात. 

 





Source link