एन. रघुरामन यांचा कॉलम: व्यावसायिक आयुष्याच्या पलीकडे ओळख निर्माण करा

0
14
एन. रघुरामन यांचा कॉलम:  व्यावसायिक आयुष्याच्या पलीकडे ओळख निर्माण करा


2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

​वयाबराेबरच अनेक लोकांचे करिअरदेखील वाढत आहे. मुंबईत आयोजित एका नोकरी मेळाव्यात ५ हजार ५०० हून अधिक ज्येष्ठांच्या उपस्थितीतून मला हे जाणवले. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या ३८ वर्षांच्या नोकरीत आणखी एक वर्ष जोडल्यानंतर त्यांना नवीन पदनाम मिळेल ते म्हणजे- निवृत्त. ही गाेष्ट त्यांना घाबरवणारी आहे. अजूनही चांगली नोकरी असलेल्या ज्येष्ठांत त्यांचा समावेश हाेता. ते धीराने रांगेत उभे राहून एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जात होते. तेथे त्यांच्या वयानुसार नोकऱ्यांची यादी वाचून दाखवली जात होती.

मी त्यांना विचारले असे का? त्यांनी सांगितले की हा वयापेक्षा लॉजिस्टिक्सचा प्रश्न आहे. दक्षिण मुंबईतील ऑफिस क्वार्टरजवळचे भाडे खूप जास्त आहे. त्यांच्या पत्नीला निवृत्तीपूर्वी चार वर्षे शिल्लक असल्याने त्यांना अजून उपनगरात जायचे नाही. मुंबईच्या भयानक रहदारीत प्रवास करायचा नाही. मुले परदेशात स्थायिक असल्याने त्यांना वाटते की ते अजूनही उत्पादक राहू शकतात. त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. त्यांनी मला विचारले, मुकेश अंबानी वयाच्या साठव्या वर्षीही विविध महत्त्वाकांक्षी खासगी क्षेत्रातील उपक्रम चालवू शकतात तर मी आयआयटी पदवीधर असल्याने ते का करू शकत नाही? मी फक्त मान हलवली आणि शुभेच्छा दिल्या. मी चालायला सुरुवात करताच तो मागून विनोदाने म्हणाला, “तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात आणि समाजासाठी अजूनही प्रासंगिक आहात.’ मी हसून हात हलवला.

अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. ते कामाच्या ठिकाणी राहण्याचे मार्ग शोधत आहेत. कोणीही हे सत्य नाकारू शकत नाही की भारताला स्वतःला तरुण देश म्हणून घेणे आवडते. परंतु कामाच्या ठिकाणी ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. २०५० पर्यंत ६० वर्षांपेक्षा जास्त लोकसंख्या ३४.७ काेटी हाेण्याचा अंदाज आहे. सुमारे पाचपैकी एक भारतीय ज्येष्ठ नागरिक असेल. मुंबईसारख्या प्रमुख शहरांत हा बदल आधीच दिसून येत आहे. तेथे प्रजनन दर झपाट्याने कमी झाला आहे आणि वयाेमान वाढले आहे. वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे लोकांना शक्य तितके कमाई करत राहण्यास भाग पाडले जात आहे.

लोक मोठ्या वयातही निवृत्ती पुढे ढकलतात याची अनेक कारणे आहेत. काहींसाठी आर्थिक कारणे आहेत. बरेच जण उच्चशिक्षित व्यावसायिक आणि व्यवसाय मालक आहेत. ते खरोखर त्यांच्या कामाचा आनंद घेतात. अनेक दीर्घकालीन कामगार स्वयंरोजगार करतात. कदाचित त्यांच्या कामाच्या वेळापत्रकावर त्यांचे चांगले नियंत्रण असते. काम आवडणारे म्हणतात की त्यांना याद्वारे समाजाशी जाेडून राहता येते. कामाच्या माध्यमातून त्यांचे मन आणि शरीर सक्रिय राहते. काही जण काम सोडू शकत नाहीत. बऱ्याच संस्था जुन्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांना समजून घेण्याच्या त्यांच्या क्षमतेचा लाभ घेण्यासाठी त्यांना कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना समस्या सोडवणारे मानले जाते. ते वेळेवर येतात आणि शिस्तीने काम करतात.

तरुण कर्मचारी त्यांच्याकडून शिकतात. अनेक संस्थांनी त्यांच्या सर्व क्षेत्रात “ग्रँड मॅनेजर’ म्हणून अनेक मुख्य अनुभव अधिकारी (सीएक्सआे) नियुक्त केले आहेत. त्यांच्यासाठी पैशापेक्षा प्रासंगिकता आणि उद्देश अधिक महत्त्वाचा आहे. “विस्डम सर्कल’सारखे गट प्रकल्प-आधारित काम आणि सल्लागार भूमिका शोधतात. या गटात १,२०० संस्थांसोबत काम करणारे १ लाखांहून अधिक वरिष्ठ सदस्य आहेत. कंपन्यांना हे समजून घेणे आवश्यक आहे की वरिष्ठ त्यांचे ज्ञान सामायिक करण्यास तयार असतात. परंतु पूर्णवेळ नाही. बांधकाम कंपनीतील एक वरिष्ठ अभियंता साइट प्रभारी म्हणून निवृत्त होऊ शकतो. परंतु ते प्लंबिंगमध्ये उत्कृष्ट असतील तर त्यांना आयुष्यभरासाठी सर्वोत्तम प्लंबर म्हणून लक्षात ठेवले जाईल. कोणत्याही प्लंबिंग समस्येसाठी त्यांनाच बोलावले जाईल.

हा लेख मोबाइलवर ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.



Source link