‘हा माझा मुलगा आहे आणि मी याला तुमच्या देखरेखीत सोडत आहे, याची काळजी घ्या.’ माझी आई अशाच प्रकारे माझ्या बालपणीच्या घराबाहेर उभ्या असलेल्या त्या मोठ्या उंबराच्या झाडाशी माझी ओळख करून देत असे. त्या झाडाच्या दोन मजबूत फांद्यांना साडीचा झोपाळा बांधून आई मला त्यात झोपवत असे. ते झाड अतिशय घनदाट आणि सावली देणारे होते. मी झोपाळ्यात झोपलेला असताना आई झाडाखाली बसून तांदूळ, डाळ निवडत असे. झोपेतून उठल्यावरही मी कधी रडलो नाही. कारण ते झाड माझे मन रमवत असे. वाऱ्याच्या मंद झुळकीने माझ्या चेहऱ्याला कुरवाळणे असो किंवा फांद्यांवर पक्ष्यांना बोलावून त्यांच्या किलबिलाटाने मला चकित करणे असो, ते झाड माझा मित्र बनले होते. सूर्याची किरणे माझ्या डोळ्यांवर येत तेव्हा ते झाड एखाद्या रक्षकाप्रमाणे वाऱ्याच्या वेगाने आपली फांदी मध्ये आणून मला सावली देत असे. मला पुसटसे आठवते की 5-6 वर्षांचा असताना त्याच झाडाखाली खेळायचो. झाडाची साल काढताना अनेकदा माझ्या नखांना दुखापत व्हायची आणि मी त्याच्या पानांपासून काहीतरी वस्तू बनवायचो. त्यानंतर एका उन्हाळ्यात स्थानिक नगर प्रशासनाने रस्ता बनवण्यासाठी ते झाड तोडले. त्या ठिकाणची रिकामी जागा पाहून मी आणि आई खूप दुःखी झालो. त्यानंतर आई कित्येक वर्षे गावाकडे गेली नाही आणि मीसुद्धा गेलो नाही. पण त्या सगळ्या वर्षांत आई त्या झाडाबद्दल आणि माझ्या बालपणातील आठवणी सांगत राहिली. कारण ते झाड माझ्या पणजोबांनी लावले होते. झाडाशी असलेली नाळ अशी जोडलेली होती. त्यामुळे त्याचे नसणे आमच्यासाठी दु:खद होते. त्याच्या जिव्हाळा निर्माण झाला होता. आपल्यापैकी अनेकांचे एखाद्या झाडावर प्रेम असते. मी झाडे आणि मानवी संबंधांवर संशोधन वाचले तेव्हा मला समजले की एखाद्या झाडाबद्दल आपुलकी वाटणे ही असामान्य गोष्ट नाही. वरवर पाहिले तर झाडे पाळीव प्राण्यांप्रमाणे कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. पण आपण त्यांची उपयोजिता पाहतो तेव्हा समजते की केवळ लाकूड, सावली आणि हवाच नाही, तर ते हवेतील प्रदूषके काढून टाकतात, कार्बन शोषून घेतात आणि पावसाच्या पाण्याचा वेग कमी करतात. आपला त्यांच्याशी एक सहजीवी संबंध आहे. फिनलंडमधील एका संशोधनात तज्ज्ञ काल्सा वाइनियो यांनी झाडांवरील प्रेमाची तीन कारणे सांगितली आहेत. पहिले म्हणजे जुन्या स्मृती किंवा आठवणी. दुसरे म्हणजे अनेक ठिकाणी मूल जन्माला आल्यावर झाड लावण्याची परंपरा असल्याने आपण त्यांना आपल्यासोबत वाढताना पाहतो. तिसरे म्हणजे झाडांचे आकर्षण. ती आकाराने मोठी, प्रभावशाली आणि प्राचीन असतात. अमेरिकेतील एका फॉरेस्ट्री अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना एका झाडाची मुलाखत घेण्याचे काम देण्यात आले होते. विद्यापीठ तुम्हाला हे शिकवते की हे काम नेमके कसे करायचे. विद्यार्थी बाहेर जाऊन एक झाड शोधतात. त्यानंतर एका झाडासमोर जाऊन त्यास स्वतःची ओळख करून देतात. हे स्वतःला पटवून देणे असते की आपण एका जिवंत अस्तित्वाजवळ जात आहोत. यामुळे तुमच्या कल्पनाशक्तीचे दरवाजे उघडतात आणि तुम्हाला जाणवू लागते की झाड तुमच्याशी बोलत आहे. विद्यार्थ्यांना या झाड भेटीबाबतच्या काही सूचना दिल्या जातात. त्यात झाडाचा तपशील द्यावा लागतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी भेटीदरम्यान काळजीपूर्वक झाडाचे निरीक्षण करावे. या भेटीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे झाडासोबत 10 मिनिटे शांत बसणे. डोळे मिटून मनात येणाऱ्या विचारांना येऊ द्या. तुम्हाला नक्कीच जाणीव होईल की झाड संवाद साधत आहे. हा महत्त्वाचा क्षण असून झाडाशी भावनिक नाते तयार होते. त्यामुळेच हे वर्तन एकप्रकारे पर्यावरणाचे संरक्षक मानले जाऊ शकते.
फंडा असा की, तुम्ही आसपासच्या निसर्गाला ओळखू लागलात, तर तुम्ही त्याचे मूल्य समजून घेता, त्याचे रक्षण करता. त्याच क्षणी तुमचे स्वतःशी असलेले नाते एका वेगळ्या उंचीवर पोहोचते. एखाद्या रविवारी हा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे?
Source link





