
Agra Suicide Case: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा तरुण कर्मचारी मानव शर्माने 24 फेब्रुवारी रोजी आग्रा येथील राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. जीवन संपवताना त्याने व्हिडीओही बनवला, जो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या व्हिडीओवरून समजेल की मानवाने असे टोकाचे पाऊल उचल्यामागे त्याच्या पत्नीचे कथित प्रेमसंबंध आहेत. मात्र, त्याची पत्नी निकिता शर्माने त्याने केलेले हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि मानवने तिच्या भूतकाळाबद्दल चुकीचा विचार केल्याचे सांगितले. तिने असाही दावा केला की त्याला तिचा भूतकाळ समजल्यानंतर तो हिंसक झाला, स्वतःला इजा करू लागला आणि दारू पियू लागला.
पत्नीने केलेला बहिणीला मेसेज (manav sharma’s wife and sister whatsapp chats leaked )
निकिताने असा दावा केला आहे की त्याच्या मृत्यूच्या रात्री तिने मानवची बहीण आकांक्षा हिला त्याच्यावर लक्ष ठेवण्याची वारंवार विनंती केली होती. दोघांमधील लीक झालेल्या व्हॉट्सॲप चॅट्समधून दिसून येत आहे. ज्यामध्ये मानवची बहीण आकांक्षा निकिताला मानवच्या कॉल्सकडे दुर्लक्ष करून झोपायला सांगताना दिसत आहे.
हे ही वाचा: “लग्नाआधी तो…” आयुष्य संपवणाऱ्या TCS मॅनेजरच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा
पत्नी आणि बहिणीमधील व्हॉट्सॲप चॅट
रात्री 2 वाजण्याच्या सुमारास निकिताने तिच्या वहिनीला मानव नशेत असून तिचे ऐकत नसल्याचा मेसेज केला.
उत्तरात आकांक्षा म्हणाली, “काही हरकत नाही. इग्नोर कर, झोप तू..”
निकिताने सांगितले की, व्हिडीओ कॉल दरम्यान तिने पाहिले की मानव बेडवर ठेवलेल्या खुर्चीवर बसला होता, त्याच्या गळ्यात कापडाचा तुकडा बांधला होता आणि दुसरा पंख्याला बांधला होता. तिने आकांक्षाला सावध केले की तो दारूच्या नशेत आहे आणि स्वतःचा जीव घेऊ शकतो.
हे ही वाचा: ‘माझ्या मामानेही माझ्यावर…’; आत्महत्या करणाऱ्या TCS मॅनेजरच्या पत्नीचा Video Viral
निकिता वारंवार आकांक्षाला मानवाकडे लक्ष देण्याची विनवणी करत होती, पण आकांक्षाने तिला धीर दिला की काहीही होणार नाही आणि तिला ‘मजबूत बनण्यासाठी’ आणि ‘आराम करण्यास’ सांगितले. “निक्की, प्लीज आराम कर. तुला आता स्ट्राँग व्हावं लागेल,” असे मानवची बहीण निकिताला म्हणाली.
मानवने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या पत्नीने त्याला वाचवले होते, असेही या चॅटमधून समोर आले आहे.
सविस्तर प्रकरण इथे जाणून घ्या: ‘पुरुषांचाही विचार करा’ म्हणत TCS च्या मॅनेजरची आत्महत्या! बायकोच्या ‘त्या’ हट्टाने घेतला जीव
Disclaimer: जीवन अनमोल आहे. त्याचा पूर्ण आदर करा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जर तुम्ही एखाद्या समस्येमुळे किंवा घटनेमुळे व्यथित असाल तर जीवनाचा त्याग करण्याची गरज नाही. चांगले आणि वाईट काळ येतच राहतात. परंतु जेव्हाही काही कारणास्तव तुम्हाला तीव्र निराशा, नैराश्य, ताण वाटेल तेव्हा सरकारने दिलेल्या ९१५२९८७८२१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.







